नाशिकः वय ९१.....वजन फक्त ३३ किलो....साडी नेसतांना घरात पाय घसरून पडलेल्या एका वृध्द महिलेच्या कंबरेचे हाड( हिप जॉईंट) मोडले, निखळले अगदी घरांतच ती वृध्द महिला पडून, तिला उठवेना तसेच बसवेनाही,...पण कुटुबांने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना घरी बोलून कंबरेचा एक्स रे काढले, हाड निखळले असल्याने तसेच तातडीने शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला अस्थिरोग तज्ञ डॉ.जुगल पटेल,डॉ.प्रतीक पटेल यांनी दिला. वय जास्त आणि वजन कमी यामुळे ही शस्त्रक्रीया करणे हे एक जोखीम होती, डॉक्टरांसमोरही एक आव्हान होते, पण रूग्णांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला..
त्याचे झाले असे, पोकार कॉलनी येथे राहणाऱ्या आणि ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या साधक असलेल्या लक्ष्मी श्यामदास अलवाणी(वय ९१ वर्षे) या केंद्रात जाण्यासाठी साडी नेसत असतांना त्यांचा साडीत पाय अडकला आणि त्या जागेवरच पडल्या आणि कंबरेचे हाड निखळले. वय खूप असल्याने जवळच असलेल्या जीवक हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना घरी बोलून त्यांचा एक्स रे काढण्यात आला. त्यात कंबरेचे हाड मोडल्याने, गॅप पडल्याचे( हिप जॉईंट) दिसले. शस्त्रक्रीया न केल्यास त्यांना जागेवरच बसून रहावे लागेल आणि तातडीने शस्त्रक्रीया केल्यास किमान घरभर तरी त्या चालू शकतील,असे डॉक्टरांनी सांगितले, रूग्णालयात दाखल केले. पण वय जास्त,वजन कमी आणि भूल दिली तरी ती चढेल,पुढे काय होईल, त्यातही यश कमी आणि जोखीमच अधिक असेल अशा सर्व बाबींची डॉक्टरांनी कुटूंबाना कल्पना दिली.
कुटूंबाचा शस्त्रक्रीयेचा निर्धार अन् डॉक्टरांचे परिश्रम
अखेर कुटूंबाने त्या वृध्द महिलेवर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. त्या महिलेला मधुमेह,रक्तदाब यासारखे कुठलेही आजार किंवा शस्त्रक्रीया नाही तसेच एकही गोळी नसल्याने ती महिलाही शस्त्रक्रीयेस तयार झाली, तिची प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉ.पटेल यांनी केलेल्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर शस्त्रक्रीया अखेर यशस्वी झाली. एक दिवस आपत्तकालीन कक्षात ठेवल्यानंतर तिला साधारण कक्षात स्थलांतरीत करण्यात आले आणि त्यानंतर दोन चार दिवसात घरीही पाठवण्यात आली. आता ती महिला पुर्वीप्रमाणे आपली स्वतःची कामे हळूहळू करू लागली असून चालता फिरताही येऊ लागले आहे.
मी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी गेल्या तीस वर्षापासून जोडली गेलेली आहे, आमच्या केंद्रात ध्यानधारणा,योगासने,सत्संगसेवा ही नियमित चालते, माझाही या सर्व कार्यक्रमात नेहमीच सहभाग असतो, या नित्यध्यानधारणा आणि सेवेमुळे माझी इच्छाशक्ती वाढली आहे, नकारात्मक भाव दूर जाऊन एक सकारात्मक उर्जा या सर्व क्रियेतून मला मिळते, त्यामुळेच ही अवघड वाटत असणारी शस्त्रक्रीया सहजपणे होऊन गेली मला कळलेही नाही. नियमित साधनेचा उपयोग होत असतो म्हणून सर्वांनी कुठल्यातरी ध्यानधारणा,योगासने,सत्संगसेवेत आपले योगदान द्यायला हवे असे वाटते
श्रीमती लक्ष्मी श्यामदास अलवाणी,साधक,प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र,मेरी
No comments:
Post a Comment