लहानपणी जुन महीन्यात काळे ढग आकाशात
बघितले की की इवल्याश्या मनात भावनांचे वादळ सुरु व्हायचे... पहील्या पावसात
भिजण्यास आतुर झालेली धरणी व त्यानंतर होणार्या सुगंधाच्या दरवळीची चाहुल लागलेले
माझे अपर् नाक ... काळ्याकुट्ट आभाळात चमकनार्या विजांचे तांडव बघण्यास अधिर
झालेले पिटुकले नयन व कडकडाट ने बधिर होण्यास उत्सुक असणारे माझे एवढेसे कान ...
सोबतच येणारे थंडगार पाण्याचे टपोरे थेंब झेलण्यास रोमांचित असणारे गोबरे गाल...
अजुनही डोळ्यासमोर उभा राहतो तो सोहळा पहील्या पावसाच्या आगमनाचा !!
मग सुरु होतात
वाहणार्या पाण्याच्या ओहळात व्हलवायच्या छोटुश्या कागदी होड्या बनववायची
तयारी ... न डुबता दिसेनास्या होडींमुळे झाल्याचा निरागस आनंदव डुबल्यावर
होणारे अबोल दु:ख .. भावनांचा हा हींदोळा झुलतांना ताई ने करुन दिलेली शाळा सुरु
होण्याची आठवणीने पार झोका झपकन थांबायचा. सुट्ट्या संपणार ह्या कल्पनेने
कावरेबावरे झालेले मन व उतरलेला चेहरा आई ने शाळेतल्या मित्रांची
करुन दिलेल्या आठवणीने परत खुलायचा ...मग सुरु व्हायचा हट्ट बाबांकडे नवीन छत्री
साठी... खालेले धपाटे व नंतर आजोबानी घेउन दिलेला रंगीबेंगी रेनकोट घालुन मिरवणे...
ह्या अविट आठवणींचा ठसा मनाला अजुनही गारुड करते... अमिट क्षणांचा हा
खजिना हा आपल्या सगळ्यांकडे असतो जपुन ठेवलेला ... मनाच्या खास खणात ... जो उघडतो
दर वर्षी येणार्या पहील्या पावसासोबत !!!
गार वारा हा टिपूस नभ
दाटले ग...
वर्षातले 4 महिने पावसाळ्याचे असतात पण तस आपण पाहिले तर 2 , 3 महिनेच पाऊस चांगला
पडतो...गावाकडे लहान असताना पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असायची...थोडा जास्त
पाऊस झाला की रात्री खेकडे पकडायला जाणे...मध्येच साप दिसणे बेडक पण खूप... आणि
चिखल तर बोलूच नका ही जी काही मजा होती ती शब्दात तरी नाही व्यक्त करता यायची..पण
जसे जसे मोठे होत गेलो तर पावसाळ्याचे महत्व समजायला लागले. पहिला पाऊस पडला
की गावाकडील मजा वेगळीच आंबे पडायचे पाऊस उघडला की लगेच आंबे गोळा करायला जाणे..
पहिल्या पाऊसानंतर करवंद अजून गोड होतात कशी होतात कुणास ठाऊक पण निसर्गाची किमया.
कुणाला किती थेंब वाटायचे
पहिला पाऊस असाच कोसळतो धरणीवर त्याचे ते बरसणे अकारण नसते.
तर ओढ असते धरणीची. पहिला पाऊस आणि मातीला येणारा सुगंध अनुभवायचा असेल तर
शहरापासून दूर गावालाच गेलं पाहिजे. पाऊसाच्या पाण्यासाठी तहानलेली धरती पहिल्या
पाऊसाच्या थेंबाबरोबर मोहरून जाते. बऱ्याच दिवसाच्या विरहानंतरच ते पहिलंच मिलन
असावं. त्यातून ती पूर्ण न्हाऊन निघते. त्यांचा तो मिलनाचा प्रसंग निसर्गाला
सुगंधीत करून टाकतो.
थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर
आणि मातीचा गंध, कड़क चहा , चिंब भिजायला
तयार रहा, पहिल्या
पावसाच्या पहिल्या आठवणी जगायला तयार रहा....पहिला पाऊस आणि मातीला येणारा सुगंध
अनुभवायचा असेल
तर शहरापासून दूर गावालाच गेलं पाहिजे.
ओलं चिंब भिजण्याचा आनंद औरच
हैराण झालेली धरती,रणरणत्या उन्हाळ्याचा "कार" जमिनीची होणारी
धूप ,पायाला चटके
लागणाऱ्या वाट इत्यादी व त्या वाटांवर चालणारे तुम्ही-आम्ही .
हे चित्र खूप
वेळा शहराप्रमाणे गावाकडील वाटांवर दिसतो .फरक असतो तो फक्त एका वहाणेचा. आकाशात
निरभ्र प्रकाश असताना , अचानक वातावरणाचे रूप पालटते. थोडे मोठे काळे ढग आकाशात
गर्दी करू लागतात. दाटीवाटीने,एकमेकांजवळ उभे राहतात. उभे राहिले जमले नाहीतर चक्क
एकमेकांवर आदळतात. मग निर्माण होणारा गडगडाट पहिल्या पावसाची झुळूक देऊन जातो. या
गोड झुळके बरोबर मानवी मन एक सुटकेचा श्वास सोडते .
तहानलेली धरती , एका एका
थेंबासाठी व्याकुळ झालेली असते. वर्षभराचा विरहच असतो तोहि तिचा अन काळ्या
मेघांचा....... ज्याची वाट पाहत,अंगाची लाही लाही
होणारी धरती, या शांत वाऱ्याच्या 'गार' झुळकेने हळुच
गाली गोड हसते. अन तेवढयात,पाखरांच्या चिऊ-काऊच्या किलबिलाट चाल मंद मंद टाकत हा
मेघ राजा येतो तो थेट या धरणीवर..
मित्रांनो आपण प्रेमाचा पाऊस पाहिला पण ही धरणीमाय ज्या हिरवळीने नटली होती ते सृष्टीसौंदर्य आज आपणच नष्ट करून टाकु लागलोय आणि तिच्या प्रियकराला आणि आपल्या प्रेमाच्या पावसाला हरवूनच बसलोय, आणि आज उरलं आहे ते फ़क्त पाहणं निळ्या आभाळाकडे आणि उजाडलेल्या धरणी मातेकडे खरंच असा होता आपल्या आठवणीतील पाऊस या पूर्वी?
वाट चुकल्या वासरसारखं शेतकरी वाट पाहत बसलाय पण त्याच्या
लेकरांना कडकडून होणारा घंटा नाद आणि दाटून आलेलं आभाळ आपल्या शिवारात अंगावर झेलण
ही फक्त एक आठवण बनुनच राहिली की राव.
ज्यांनी केला आणि पाहिला तो पाण्यासाठी चा मैलोनमैल प्रवास
त्यांच्या आठवणीत हरवून बसलाय माझा पाऊस अन डोळ्यात उरल आणि डोळ्यांत उरल ते फक्त
त्याच्या आठवणीत ओसंडून वाहणार पुरासारखं पाणी.
त्यांच्या भावना पावसाच्या आठवणीत अश्रू होऊन प्रसवल्या पण त्या
चातकाची तहान भागवण्यासाठी, धरणीला चिंब भिजवण्या, तो अजूनही नाही
बरसला वाट पाहतेय ती आसुसलेली धरती कधी ओघळतील त्या प्रेमाच्या सरी, तहान भागेल लेकरांची
आणि फुलेल आठवणीतील शेती, हिरवा शालू नेसलेली ती धरती.
दुष्काळी भागात हा पाऊस आठवण होऊन राहिला त्या मेघराजला एक
विनंती आहे.
आसुसलेली धरणी माय तुझ्या मिलना साठी दोन हातांचे पंख पसरून उभी
आहे, तुझ्या दाटलेल्या डोळ्यातल मोती आता बरसुदे आणि या प्रेमाच्या
सरीत ती न्हाऊन निघू दे आणि हा विरह संपू देत.
हा आहे माझ्या शेतकऱ्याच्या मनातला पाऊस जो फक्त आठवण होऊन राहिलाय
जाता जाता पावसाच्या खूप खूप शुभेच्छा....
No comments:
Post a Comment