Friday, July 15, 2011

जुलैचा असाही योगायोग....

जुलै महिन्यात दहशतवाद्यांनी जगभरातील विविध शहरांना टार्गेट केलंय...जुलै महिन्यातच दहशतवाद्यांनी स्फोटही घडवून आणले...लंडन ,मुंबई ,अहमदाबाद आणि बंगळूरु यां शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यात आले...

२९ जुलै २००३ ठिकाण: घाटकोपर(मुंबई) बेस्ट बसमध्ये सकाळी ९.१५ मि.बॉम्बस्फोट घडवण्यात आला.या स्फोटात ४ ठार,तर ३२ जण जखमी झाले

७ जुलै २००३ ठिकाण: लंडन सार्वजनिक ठिकाणांना अतिरेक्यांनी केलं टार्गेट भूमिगत मेट्रो स्टेशन आणि डबल डेकर बसमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले.यात ५२ लोक ठार झाली,तर ७०० जखमी झाले.

११ जुलै २००६ ठिकाण : मुंबई मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकल मध्ये ११ मिनिटात ७ साखळी बॉम्ब स्फोट,स्फोटासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला...यात २०९ लोक ठार,७०० जण जखमी

२५ जुलै २००८ ठिकाण: बंगळूर अतिरेक्यांनी साखळी बॉम्ब स्फोट घडवले,यात २ ठार तर २० जण जखमी झाले

२६ जुलै २००८ ठिकाण : अहमदाबाद दोन तासात झालेल्या बॉम्ब स्फोटात ४९ लोक ठार झाले,तर १२ जखमी झाले...या सर्व घटना पाहाता कुठेतरी जुलैचा योगायोग दिसून येतोय...

पुन्हा टार्गेट मुंबई....

मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचा हिटलिस्टवर राहिलीय. २००२ पासून मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे, बसेस आणि गर्दीचे ठिकाण हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलंय.
दोन डिसेंबर २००२ घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बसमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर ३१ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सिमीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती.
सहा डिसेंबर २००२ मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात पंचवीस जण जखमी झाले होते. एअर कंडिशनमध्ये बॉम्ब ठेवला होता. २७ जानेवारी २००३ विर्लेपार्ले इथल्या रेल्वेस्थानकावर झालेल्या स्फोटात ३० लोक जखमी झाले होते. संध्याकाळी झालेल्या स्फोटात एका सायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता.
१३ मार्च २००३ मुलुंड रेल्वेस्थानकावर शक्तीशाली बॉम्ब स्फोट झाला. या शक्तीशाली स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता तर ६५ जण जखमी झाले होते. २५ ऑगस्ट २००३ साली गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं झालेल्या दुहेरी स्फोटात ५२ लोकांचा मृत्यू झाला होता.
११ जुलै २००६ मध्ये एकानंतर एक असे सात साखळी स्फोट झाले. या स्फोटात सुमारे २०९ जणांनी प्राण गमावला आणि सुमारे ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. लष्कर-ए-तोएबा आणि सिमीने स्फोट घडवले. सोमवारी या स्फोटाला पाच वर्ष पूर्ण झाली होती.

Monday, May 23, 2011

सर्व काही परमेश्वरावर....



पश्चिम बंगालच्या सिलिगुडी भागात अनोखी जुळी मुलं जन्माला आलीयत. या बाळांचं धड एक आहे आणि डोकी दोन आहेत. या बाळांना जन्म देणाऱ्या आईची प्रकृती ठीक आहे. पण या बाळांच्या जगण्याची शक्यता कमी वर्तवली जातेय.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी भागात एका महिलेनं एक धड पण दोन डोकी असलेल्या बाळाला जन्म दिलाय. हे बाळ साडेतीन किलो वजन असून त्याची उंची ४८ सेंटिमीटर आहे. काही वर्षांपूर्वी लक्ष्मी नावाच्या महिलेन अशाच जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र हा कोणताही चमत्कार नसल्याचं डॉक्टरांच म्हणण आहे. सध्या हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

कॉन्जॉईन ट्विन्स ही मेडिकल क्षेत्राला आव्हान देणारी केस आहे. या बाळांची स्थिती आशी आहे की त्यांना शस्त्रक्रिया करुन वेगळं करणंही अशक्य असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ही बाळं जिवंत राहण्याची शक्यताही फार कमी असते.

Saturday, March 5, 2011

तुम्ही सर्वजण आम्हाला हवे आहात!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नावाजलेले खेळाडू सर्वोत्तम कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पॉंटींग अशा मातब्बर खेळाडूंसाठी तर हा वर्ल्डकप अत्यंत महत्वाचा आहे. त्‍याचं महत्‍वाचं कारण म्‍हणजे ही स्‍पर्धा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची ठरण्‍याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळंच ही स्पर्धा स्वतःसाठी, देशासाठी आणि आपल्‍या चाहत्‍यांसाठी यादगार बनवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्‍कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्‍या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्‍याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्‍याच्‍या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही.
भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्‍या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्‍याची शक्यता खूपच कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई

तुम्ही sarvad सगळ्यानाच हवे आहात!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नावाजलेले खेळाडू सर्वोत्तम कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पॉंटींग अशा मातब्बर खेळाडूंसाठी तर हा वर्ल्डकप अत्यंत महत्वाचा आहे. त्‍याचं महत्‍वाचं कारण म्‍हणजे ही स्‍पर्धा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची ठरण्‍याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळंच ही स्पर्धा स्वतःसाठी, देशासाठी आणि आपल्‍या चाहत्‍यांसाठी यादगार बनवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्‍कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्‍या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्‍याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्‍याच्‍या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही. भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्‍या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्‍याची शक्यता खूपच कमी आहे.
ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई

Saturday, November 27, 2010

मराठी बाणा जपणारा लोकशाहीर

लोकशाहीर विठ्ठल उमप....उर्फ सर्वांचे अण्णा....महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा ठेवा जपणारा ऐंशी वर्षाचा एक उमदा...कलावंत...आपल्या जेष्ठत्वावर मात करत तरूणांना लाजवेल असंच जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीमत्व...शाहीरीला जागतिकस्तरावर वेगळं स्थान, नावलौकीक मिळवून देणारे लोकशाहीर आपल्यातून इतक्या सहजपणे जातील, याची कुणालाही कल्पना नव्हती....
नाशिकला कालीदास कलामंदीरात झालेल्या एका कार्यक्रमांसाठी उमप आले होते...त्याचे जांभुळ आख्यान नाटक आणि मी मराठी हे अलिकडच्या काळातील कलाविष्कार मी पाहिले होते. त्यामुळं त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती...पण त्यांच्याभोवती असलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळं ते सहज शक्य होत नव्हतं...अखेर पत्रकार असल्यानं आपल्या पत्रकारितेचा त्यांच्या भेटीसाठी वापर करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांच्याच जवळच्या एका कार्यकर्त्यांला जवळ घेऊन शाहीरांशी गप्पा मारण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे हवी, असं सांगितलं. त्या कार्यकर्त्यांनंही लगेच शाहीरांच्या कानात निरोप सांगितला आणि काय आश्चर्य काही वेळानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून ते बॅक स्टँजला असलेल्या कक्षात आले आणि मग काय सुरु झाली गप्पाची मैफल...कौटुंबिक परिवार, शालेय शिक्षण, शाहीरीची सुरवातीपासून तर जांभुळ आख्यान आणि अगदी अलिकडच्या मी मराठी कलाविष्कारापर्यत गप्पाची मैफल रंगत गेली...मध्येच मी गाण्यांची फर्माईश करत आणि शाहीरानीही मोठ्या अदबीनं फु बाई फु, माझी मैना गावाकडं राहिली,फाटकी नोट, ए दादा आवर ये...अशी गाण गात मला सुखद अनुभव दिला...आंबेडकरी चळवळीतील आठवणी सांगतांना त्यांनी हा माझ्या भीमरायाचा मळा...हे गाजलेले गीत ऐकवत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा महिमाच माझ्यासमोर कथन केला....एवढ्या वयांतही त्यांच्या आवाजातला एक वेगळा बाज मला अनुभवायला मिळत होता...केवळ विचारलेल्या प्रश्नांनाच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक माहीती मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली...त्यांचे काही काही प्रसंग तर थक्क करून सोडणारं होते....पोवाडा, कव्वाली भारूड, गझल अभंग की छक्कड लावणी असो असे सारंच प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचां त्यांचा वेगळा हातखंड मला पहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाला...गप्पाची मैफल सुरु असतांनाच मध्येच आपल्या स्वयंसेवकांकडून कार्यक्रमांच्या तयारीचा आढावाही ते घेत होते....मी त्यांच्याकडं फक्त दहा मिनिटांची वेळ मागितली होती मात्र शाहीरांनी माझ्याशी तब्बल पंचवीस मिनिटे गप्पा मारल्या...गप्पानंतर ते लगेचच आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी रंगमंचाकडे गेले...मात्र जाण्यापूर्वी त्यांनी माझं नाव पुन्हा एकदा विचारलं...मी नाव सांगितलं श्रीकृष्ण कुलकर्णी...श्रीकृष्ण म्हणजे किसना, कृष्णा होय...बरं बघ तुझ्यावरही मी एक गाणं रचलय..मी लगेचच म्हटंल कुठले ते...आणि त्यांनी लगेचच कृष्णा धमाल रे...हे प्रसिध्द गाणं म्हणतं गात रंगमंचाकडं जाण्यास सुरवात केली...मी फक्त त्यांच्या या अनोख्या व्यक्तीमत्वाकडं पाहतंच राहिलो....

Monday, September 13, 2010

भाजप नेते म्हणतात योगायोग...

अलाहाबाद उच्च न्यायालयानं अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात २४ सप्टेंबर ही तारीख निश्चित केलीय. म्हणजे अयोध्यप्रश्नी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेचा विसावा वर्धापनदिन २३ तारखेला एक दिवस अगोदर आहे. असं असलंतरी भाजप या निकालाबाबत आशावादी आहे.अयोध्याप्रश्नी भाजपमध्ये सध्या शांतता आहे. हा निकाल न्यायालयात असल्यानं भाजप नेते कुणीही या वक्तव्यावर मत व्यक्त करण्यात तायर नाही. निकालाबाबत पक्षानं वेट अँन्ड वॉचची भूमिका स्विकारलीय.
हे खरं असलं तरी अडवानी यांनी आपल्या ताज्या ब्लॉगवरील लेखात अयोध्यानिकाल आणि आपल्या रथयात्रेला वीस वर्ष पूर्ण याविषयी विवेचन केलय. या दोन्ही घटना एक दिवसाआड पाठोपाठ येत आहे. अडवानींनी म्हणतात,माझे रोल मॉडेल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मतारीख 25 सप्टेंबर आहे. सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्राही 1990 मध्ये त्याच दिवशी काढली. त्याच दिवशी मी अजूनही नियमितपणं सोरटी सोमनाथाच्या दर्शनासाठी जातो. आता तर अयोध्या प्रकरणाचा निकाल 25 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारांय. हा सर्व योगायोग असल्याचे मी मानतो असं नमूद केलय. अयोध्या प्रकरणी पक्षनेते काहीही बोलण्यास तयार नाही,असं असलंतरी दर आठवड्याला भाजप मुख्यालयाशेजारी आंग्लभाषिक पत्रकारांचा दरबारच भरलेला दिसतो. त्यामुळं पक्षने त्यांची गोची झालीय. त्यांना पत्रकारांना काहीच माहिती देता येत नाही.
पक्षाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर नितीन गडकरीनी अयोध्या प्रश्‍न घटनेच्या चौकटीत सुटावा, असं मत मांडलं होतं. भाजपमध्ये सध्या गडकरी गट विरूध्द राजनाथसिंह गट यांच्यात शीतयुद्धाचं वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकालानंतर गडकरी यांचे ते मत कायम राहील काय, काय पडसाद उमटतात याबाबतही उत्सुकता आहे. निकाल विरोधात गेल्यास काही वरिष्ठ नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठावण्याचं निश्चित केलंय. अयोध्या प्रकरणाबाबत लिबरहान आयोगाचा अहवाल फेटाळणाऱ्या भाजपची केंद्रात सहा वर्षे सत्ता होती. त्यावेळेस हा अहवाल का आणला गेला नाही, अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल त्या काळात का लागला नाही, या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे नाहीत.