Tuesday, December 10, 2024

 नो युवर आर्मी विथ भोसला द्वारे सैन्य दल आणि करिअरची परिपूर्ण माहिती घेण्याची संधी

सीएचएमई संस्थेचा पुढाकार,१४ व१५ डिसेंबरला युध्द शस्त्र प्रदर्शन व सामुग्री


नाशिकः सैन्यदलात वापरल्या जाणाऱ्या विविध आयुधांबरोबरच तेथील सर्वप्रकारचे प्रशिक्षण आणि सैन्यदलातील करिअरच्या संधीची नाशिककरांना माहिती व्हावी, यासाठी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर नो युवर आर्मी विथ भोसला  हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच नाशिककरांनी या प्रदर्शनास जरूर भेट देऊन सैन्य दलाची इत्यंबूत माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

१६ डिसेंबर १९७१ ला भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या युध्दात भारताने विजय मिळवला होता, त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जात आहे. हेच औचित्य साधत सीएचएमईएस तर्फे हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीस सीएचएमई संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांच्यासह मनपा शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील,गर्ल्स स्कूलच्या कमांडंट मेजर सपना शर्मा,वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पाडी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रजनी गुंड,मोटार वाहन निरिक्षक विनोद वसईकर आदी उपस्थित होते.

अनोखा उपक्रम,जरुर लाभ घ्यावा

सैनिकी क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या सीएचएमई संस्थेने विजयदिनाचे वेगळे औचित्य साधत या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे ठरविले याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले,आजच्या स्पर्धेच्या युगात सैनिकी क्षेत्र जीवनात शिस्तीबरोबरच आत्मविश्वास,धाडस निर्माण करण्याचे क्षेत्र आहे. त्यात करिअरच्या भरपूर संधी आहे. त्यामुळेच प्रत्येक कुटूंबाने आपल्या पाल्यांना हे प्रदर्शन जरूर दाखवावे, त्यातून या शिक्षणाकडे तरूणवर्ग आकर्षीला जाईल. नाशिकमधील सर्व शाळांनी सुध्दा नियोजन करून या प्रदर्शन आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री.शर्मा यांनी प्रदर्शनाच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या. प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी भोसला मिलीटरी कॉलेजमधील भूषण देशमाने (मो.९७३०७२३००५) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.


प्रदर्शनाची अनोखी रचना

प्रत्येकाची देशभक्ती द्विगुणित होऊन सैनिकांचे देशप्रती योगदान या प्रदर्शनाद्वारे अनुभवायला मिळणार आहे.संस्कृती आणि संस्कृतीने नटलेल्या व राष्ट्रीय एकात्मतेने संपन्न असलेल्या देशाच्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा येथे नाशिककरांना बघायला मिळणार आहे. या प्रदर्शनात बोफोर्स,तोफा,रणगाडे,रायफल्स,रॉकेट लाऊंचर,इंडियन फील्ड गन,आर्मी अभियंता साहित्य, धनुष्य आयएफजी,एलएमजी गन आदी आयुध साहित्य असणार आहे

No comments:

Post a Comment