शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे निगर्वी,सालसं आणि ध्येय निश्चीत करून शांतपणे मार्गक्रमण करणारा नेता... तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोख ठोक भूमिका मांडणारा,काहीसा संतापी परंतु आपल्याला हवी असलेली कृती करूनच घेणारे,ती करण्यासाठी भाग पाडणारे,ध्येयवादी व्यक्तीमत्व म्हणून परिचित......ही दोन्ही व्यक्तीमत्व चालणं,बोलणं,वागण्यापासून सर्वच बाबतीत भिन्न. त्यांच्याप्रमाणंच त्यांचे चाहतेही अर्थात "फॅन्स'भिन्न असणं स्वभाविक आहे. राज आणि उध्दवच्या चाहत्यांची स्वतंत्र कम्युनिटी असून या कम्युनिटीवरील सदस्यां(मेंबर)च्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या दिड-दोन महिन्यांत आपण विविध संकेतस्थळाच्या कम्युनिटीवर नजर टाकल्यास निवडणूकींमुळे सदस्य संख्येचा आलेख वाढता वाढता वाढे...असाच राहिला आहे हे लक्षात येईल.राज्यातले कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवायचाच. हे ध्येय शिवसेना-भाजपा युतीने समोर ठेवला आहे. त्याचदृष्टीने प्रचाराची रणनिती निश्चीत करत युतीचा राज्यभर प्रचार सुरु आहे.
दुसरीकडे नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणूकीत नवे असूनही चांगले यश मिळवले. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेत घवघवीत यश पक्षाला मिळेल. किंबहुना कोणत्याही पक्षाला मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नाही,ंअसा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आहे. प्रचारासाठी केवळ तिनच दिवस शिल्लक राहिल्याने जास्तीत जास्त भागात प्रचारासाठी जाण्यावर युती आणि मनसे नेत्याचा भर आहे. मतदानाच्या दिवशीचे मतदान आणि मतमोजणीनंतरचा कौल हे अद्याप दूर आहे. असे असलेतरी राज आणि उध्दवचे फॅन त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे शक्य नसल्याने स्क्रॅंप,चॅटींगद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. राज आणि उध्दव यांना आपल्या फॅनसला उत्तर देणं हे सध्याच्या निवडणूका रणधुमाळीत आजमितीस शक्य नाही. पण आपल्या फॅनचा हिरमोड होऊ नये. तसेच आपण त्यांच्या संपर्कात आहोत. हे दाखवण्यासाठी शिवसेना,मनसेने स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले जाते. त्यांच्या सूचना,शुभेच्छा,प्रस्ताव स्विकारले जात आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फक्त आँकुर्टवरील कम्युनिटीचा विचार केला तर ही कम्युनिटी बरीच जुनी आहे. राज ठाकरे एमएनएस(18हजार234 सदस्य),राज ठाकरे मराठी हदयसम्राट(26,512)राज आँकुर्ट सेना(12,438),राज ठाकरे एक वादळ(11हजार908) याशिवाय फक्त राज ठाकरे नावाचे स्वतंत्र पाच फॅन्स क्लब असून त्यांच्या सदस्यांची संख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. "मुंबई आहे मराठी माणसाची, नाही कोणाच्या बापाची....ज्यांनी लावली महाराष्ट्राची वाट, ते काय आणणार नवीन पहाट,सत्तेसाठी सातशे साठ,महाराष्ट्रासाठी एकच मराठी हदयसम्राट राज ठाकरे...यासारखे संदेश कम्युनिटीवर फॅन्स क्लबने दिलेले आहेत. मनसेची "डब्लू डब्लू मनसे ओराजी" ही स्वतंत्र वेबाईट आहेत त्याचे1हजार454 सदस्य आहेत."महाराष्ट्राचा सन्मान राखा,आम्ही तुमचा मान ठेवू,अन्यथा तुम्ही जाता तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा...आपला मुंबईकर असा संदेश दिलेला दिसतो. मनसे विद्यार्थी सेनेचे1हजार272 सदस्य आहेत. "जगाला हेवा वाटेल,असा महाराष्ट्र घडवूया' हे राज ठाकरेंचे आवाहन युवकांसाठी ठळकपणे दिले आहे. याच आवाहनाला युवकांनी प्रतिसाद देत मनविसेच्या झेंड्याखाली अनेक युवक एकत्र झाल्याचे त्यांच्या फॅन्स क्लबच्या वाढत्या संख्येहुन लक्षात येत आहे.राज ठाकरेंप्रमाणेच शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंही आपल्या फॅन्सच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या दैनंदिन नियोजनावरून दिसते. आँकुर्टवर उध्दव ठाकरे फॅन्स क्लबचे मोठे सहा ग्रुप आहेत. या ग्रुपच्या सदस्यांची संख्या सात ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. यातलाच सातवा फॅन्सचा ग्रुप हा बाळासाहेबांबरोबर असलेल्या राज उध्दव यांना माननारा आहे. या ग्रुपचे सदस्य कमी असलेतरी त्यांचे संदेश लक्ष वेधतात. उध्दव ठाकरे फॅन्स क्लबचे संदेशही वेगळेपण जपणारे आहे. एका चाहत्यांने युतीच्या नव्या सरकारची अपेक्षा व्यक्त केलीय. तो म्हणतो"येणार या महाराष्ट्रात आता शिवशाही येणार,आता ज्यांची वेळ भरली, त्यानेच आडवे यावे,उध्दव ठाकरे...आपल्या काका-मामाची मिमिक्री करून मोठा झालेला हा नेता नव्हे, या नेत्याकडे स्वतःची ओळख आहे,ताकद आहे... असं वर्णन आहे. काहीं चाहत्यांना उध्दव हे चांगले राजकारणी आणि महाराष्ट्राला दिशा देणारे नेते वाटतात.काहींनी राजकारण हा त्यांचा पिंड नाही, ते लाजाळू आणि शांतपणे एकांतात रमणारे कलाकार आहे, त्यांची आपली फोटोग्राफी कला जोपासावी असे वाटते तर काहींना बाळासाहेबानंतरचा चांगला नेता म्हणून तेच योग्य असल्याचं वाटते.राज आणि उध्दवच्या या कम्युनिटवर चाहत्यांनी आपआपल्यापध्दतीने संदेश नोंदवत आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत. या दोन्ही नेत्यांना हे संदेश भविष्यातल्या राजकारणाला भरारी,प्रोत्साहन देणारेच ठरतील यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपली कम्युनिटी अपडेट ठेवण्याबरोबरच वेबसाईटही अपडेट ठेवण्यावर भर दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या फेसबुक,हाय फाय,व्हॅंनसारख्या कम्युनिटीवरही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन सभा,वार्ताकंनाच्या बातम्या,ठळक नोंदणी, मान्यवरांचे संदेश,छायाचित्र,व्हीडीओशुटींग सर्व काही उपलब्ध करून दिलेले दिसते. त्यासाठी आयटी क्षेत्रातला स्वतंत्र ग्रुपच तिथे काम करतो आहे. हे नमूद करावेसे वाटते.--- वुई हेट राज ठाकरे
....महाराष्ट्र नवनिर्माणचे स्वप्न पाहणाऱ्या किंबहुना त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंना पाठींबा देणारा स्वतंत्र वर्ग जगभर आहे. तसा त्यांचे विचार न पटणारा,त्यांचा विचारांना विरोध करणारा वर्गही असल्याचं जाणवते. त्यांना विरोध दर्शवणाऱ्या आँकुर्टवर वुई हेट राज ठाकरे(1हजार539सदस्य),आय हेट राज ठाकरे(1हजार156)आँल हिंदुस्थान हेट राज ठाकरे(831सदस्य) या कम्युनिटी आहेत. त्यांच्यावर आपआपल्यापध्दतीने संदेश देण्यात आले आहे."वुई सपोर्ट राज ठाकरे या कम्युनिटीवरील1हजार 219 सदस्यांनी राज ठाकरेंच्या बाजूने आहेत. त्यांच्या विचाराने हे सदस्य प्रेरीत झालेले दिसतात