मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचा हिटलिस्टवर राहिलीय. २००२ पासून मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे, बसेस आणि गर्दीचे ठिकाण हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलंय.
दोन डिसेंबर २००२ घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बसमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर ३१ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सिमीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती.
सहा डिसेंबर २००२ मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात पंचवीस जण जखमी झाले होते. एअर कंडिशनमध्ये बॉम्ब ठेवला होता. २७ जानेवारी २००३ विर्लेपार्ले इथल्या रेल्वेस्थानकावर झालेल्या स्फोटात ३० लोक जखमी झाले होते. संध्याकाळी झालेल्या स्फोटात एका सायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता.
१३ मार्च २००३ मुलुंड रेल्वेस्थानकावर शक्तीशाली बॉम्ब स्फोट झाला. या शक्तीशाली स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता तर ६५ जण जखमी झाले होते. २५ ऑगस्ट २००३ साली गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं झालेल्या दुहेरी स्फोटात ५२ लोकांचा मृत्यू झाला होता.
११ जुलै २००६ मध्ये एकानंतर एक असे सात साखळी स्फोट झाले. या स्फोटात सुमारे २०९ जणांनी प्राण गमावला आणि सुमारे ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. लष्कर-ए-तोएबा आणि सिमीने स्फोट घडवले. सोमवारी या स्फोटाला पाच वर्ष पूर्ण झाली होती.
Friday, July 15, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment