Monday, August 22, 2011

अण्णा- नावाचं महाराष्ट्रीयन वादळ

नवी दिल्लीत अण्णांना झालेल्या अटकेचे पडसाद देशासह राज्यातही उमटलेत. अण्णांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरलीये.
उपोषणाला बसण्याआधीच अण्णा हजारेंना सकाळी सात वाजून २५ मिनिटांनी मयुर विहारमधून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याबरोबर अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि किरण बेदी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकलेल्या या आंदोलकांना पोलिसांनी अशा पद्धतीने ताब्यात घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले...ठिकठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध नोंदवला.
मायानगरी मुंबईतही अण्णांच्या अटकेचा तीव्र निषेध नोंदवला गेला. प्लीज अरेस्ट मी असं बॅनर पकडून अनेक तरुणांनी अण्णांनी दिलेल्या जेल भरोच्या आव्हानाला प्रतिसाद दिला....
अण्णांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तरुण-तरुणींसह सर्व वयोगटातील नागरिकांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला. यात बॅनर घेऊन मोठ्या संख्येने पुणेकर उतरले होते. आय ऍम अण्णा असं म्हणत प्रत्येकाने अण्णांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला. ...
करवीर नगरी कोल्हापूरातही मानवी साखळी उभारुन नागरिकांनी अण्णांना समर्थन दिलं....अण्णा नही आँधी है..दुसरे महात्मा गांधी है सारखे नारे देत अण्णांना पाठिंबा दर्शवला...
नाशिकमध्येही तिरंगा फडकावत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते...मी अण्णा आहे असं म्हणत या सगळ्यांनी अण्णांच्या अटकेचा निषेध केला..मी पण निर्दोष आहे..ला पण अटक करा असं म्हणत नारेबाजी केली.
अण्णांच्या राळेगणसिद्धी या गावातही लोकांनी शांततामय मार्गाने आंदोलन केलं. काल बत्ती बंदचं आव्हान केलेल्या समर्थकांनी आज गाव बंदची हाक दिली होती. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने लोक रस्यावर उतरले होते. यावेळी म्हशींचया अंगावर काँग्रेस नेत्यांची नावं लिहून त्यांचा निषेध करण्यात आला.
अमरावतीतही ज्येष्ठ नागरिक सन्मित्र मंडळाच्या वतीने अण्णांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. नागरिकांनी धरणा आंदोलन करुन लोकपाल बिल मंजूर झालंच पाहिजे अशी मागणी केली.
ठाण्यातही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नागरिक एकत्र जमले होते. लोकपाल बिलासाठी अण्णांच्या झालेल्या अटकेवर सर्वसामान्यांनी टीका केली.
औरंगाबादेतही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्य़ावर उतरले...ज्येष्ठ नागरिकांनी धरणे आंदोलन करुन अण्णांना पाठिंबा दर्शवला तर तरुणांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढून अण्णांच्या अटकेचा निषेध नोंदवला...तर लहान मुलांनीही हातात झेंडे घेऊन आपल्ा पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा दिला...
कोकणातही तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती...हातात बॅनर घेऊन, घोषणा देत तरुणांनी अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला...बॅनरवरच्या मजकुराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं...
खालापूर तालुका समिती आणि खोपोली शहर समितीकडूनही आंदोलन करुन अण्णांना पाठिंबा दर्शवण्यात आला.
सोलापुरातही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले ते अण्णांना पाठिंबा दर्शवण्यासाठी...शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांनी घोषणाबाजीने सोलापुराचे रस्ते दणाणून सोडले...मोठ्या संख्येने रस्त्यावर पोलीस बंदोबस्तही होता...खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं...
अशा प्रकारे आपण एकजूटीनं अण्णांच्या बरोबर आहोत..असाच संदेश राज्यातील तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिकांनी दिला.....

No comments:

Post a Comment