येत्या सोमवारी अमावास्या आल्याने जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरणार असून, दुपारी बारा वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. यंदा महाशिवरात्रीला जोडून सोमवती आल्याने जेजुरी दोन दिवस भाविकांच्या गर्दीने गजबजणार आहे.
सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास कऱ्हा नदीवर स्नानाचा कार्यक्रम होणार आहे. यंदा नाझरे धरणात पाणी अत्यल्प असल्याने उत्सवमूर्तींना टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे.
सोमवती यात्रेच्या तयारीसाठी देवसंस्थान व ग्रामस्थ मंडळाची बैठक झाली. त्या वेळी देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त सुधीर गोडसे, खांदेकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते.
सोमवती यात्रेवर दुष्काळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्यात सोमवती स्नानाची मोठी समस्या असणार आहे. देवसंस्थानने भरउन्हात पालखी सोहळा असल्याने जागोजागी खांदेकऱ्यांसाठी सरबत व पिण्याच्या पाण्याची सोय केल्याचे गोडसे यांनी सांगितले. खांदेकऱ्यांना पायाला चटके बसू नयेत, म्हणून पालखी मार्गावर काही ठिकाणी पाण्याचा शिडकावा केला जाणार आहे.