उल्हासनगरमधील गरीब कुटुंबातील सात वर्षांच्या मुलीवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. शस्त्रक्रियेसाठी सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम उभी करणे या कुटुंबासाठी अशक्यप्राय बाब असल्याने या मुलीवरील शस्त्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते, सजग नागरिक आणि काही सामाजिक संस्था या चिमुरडीच्या मदतीसाठी पुढे आल्या असून, आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. उर्वरित रक्कम उभारण्यासाठी नागरिकांनी साह्य करावे, असे आवाहन तिच्या आई-वडिलांनी केले आहे.
उदरनिर्वाहासाठी भटकंती करून खुर्च्या रंगविण्याचे काम करणाऱ्या निळू थोरात आणि निर्मला थोरात यांच्या सात वर्षांच्या मयूरीची ही कहाणी आहे. ती टेट्रॉलॉजी ऑफ फॅलो या सायअनॉटिक कंजेनायटल हार्ट डिसीझने (जन्मजात हृदयाचा आजार) ग्रस्त आहे. तिच्यावर पुण्यातील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तातडीने हृदय शस्त्रक्रिया (इंट्रा कार्डिऍक रिपेअर ओपन हार्ट सर्जरी) करावी लागणार आहे. अंदाजे अडीच लाख रुपये खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी 9 फेब्रुवारी हा दिवस ठरला होता; मात्र तेवढी रक्कम जमविणे कठीण असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती थोरात यांनी डॉक्टरांना केली.
खारीचा वाटा
मयूरीच्या आई-वडिलांची व्यथा मिलिंद मोरे आणि नंदा नांद्रकर या गायकांना आणि प्रफुल्ल केदारे, प्रकाश जाधव या सामाजिक कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी पुढाकार घेऊन मदत जमा करण्यासाठी संगीत मैफल आयोजित केली. साहित्यिक प्रा. विठ्ठल शिंदे यांनी 10 हजार रुपये आणि महापालिकेचे "बुलडोझर मॅन' युवराज भदाणे यांनी 5 हजार रुपये मदत दिली. मिलिंद सेळमकर, अण्णा रोकडे, राजू धावारे, प्रकाश थोरात, मुरलीधर शिर्के, जसवंत ढकोलिया, सरस्वती ऐवळे, प्रवीण वाघमारे यांनीही खारीचा वाटा उचलला. असे एकूण 40 हजार रुपये जमवून थोरात यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक ट्रस्टने 25 हजार रुपये, साईबाबा शिर्डी संस्थानने 25 हजार रुपये आणि ठाणे मेडिकल असोसिएशन यांनी 10 हजार रुपये असा मदतीचा हात दिला. अशा प्रकारे आतापर्यंत एक लाख रुपये जमा झाले असले, तरी आणखी दीड लाख रुपयांची गरज आहे.

No comments:
Post a Comment