Friday, July 15, 2016

बहुआयामी मित्रवर्य राजेश

  ट्रु फ्रेंडशिप इज रेअर,व्हर्च्युअस् बिकम फ्रेल....अर्थात खरी मैत्री ही दुर्मिळ असते. या मैत्रीपुढे मराठमोळ्या,अस्सल गावराण भाषेत बोलायचे झाले तर अगदी मातीचे ढेकळंसुध्दा अशा मैत्रीपुढे ठिसूळ होऊन जातात,फुटतात...असं विख्यात लेखक,विचारवंत अॅटीस्ट्रॉटलनं म्हटलं आहे...असाच मैत्री या शब्दाला जागणारा,व्हर्सटाईल,गुणी,लेखक,व्याख्याता अन् हो कार्टुनिस्टसुध्दा असलेले व्यक्तीमत्व म्हणजे राजेश अग्निहोत्री....एखादं लेक्चर असो,कार्टुन काढणं असो की ऐनवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच सादरीकरण असो...प्रत्येक बाबतीत राजेश पुढेच. त्यामुळेच त्याचा मला अभिमान वाटतो. अशा या गुणी मित्राला  समाजातील युवादोस्तासाठी सर्वच बाबतीत मदतीचे ठरेल,अशा अंगाने दैनिक सकाळच्या नव्यानेच सुरु झालेल्या युवारंगमध्ये काहीतरी कॉलम सुरु करण्यास मी सूचविले. या दोस्तांनंही क्षणाचाही विलंब न करता तात्काळ होकार दिला आणि सकाळच्या आवृत्यांमध्ये प्रसिध्द होत असलेले हे सदर अल्पावधीतच प्रसिध्द झालं. युवादोस्त,नागरीकांसाठी ते मार्गदर्शन ठरत आहे. गोष्टींच्या रूपाने मांडण्याच शैली आणि फारच सुरेख लिखान यामुळे ते अनेकांना भावते आहे...खास माझ्या युवादोस्त आणि मित्रमंडळींसाठी युवारंगमध्ये प्रसिध्द झालेल्या राजेशच्या या सदरातील भाग खाली देत आहे. आपणाला आवडते तर आपली प्रतिक्रीया पुढील मोबाईल,ईमेलवर जरूर नोंदवा एवढंच सांगावंस वाटतं, (मोबाईल-9975455454 अथवा agnihotriraj@rediffmail.com....)

No comments:

Post a Comment