Tuesday, November 17, 2009

विक्रमांचा बादशहा

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटप्रेमींचा देव... क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटानं विश्वविक्रमांचे डोंगर रचलेत. त्यानं तमाम क्रिकेटरसिकांना नेहमीच आपल्या सहजसुंदर फलंदाजीनं मंत्रमुग्ध केलंय. त्यामुळेच लाडका सचिन क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातल्या ताईत बनलाय.
सचिन रमेश तेंडुलकर....मूळचा मुंबईकर...जन्म २४ एप्रिल १९७३...वय३६वर्षे...उंची ५फूट ५ इंच...काहीसं एवढंच वर्णन ऐकलं की,समोर मुर्ती उभी राहते सचिन तेंडुलकरची. मुर्ती लहान पण किर्ती महान...हे शब्द तेंडुलकरच्या बाबतीत खरोखरच तंतोतंत खरे ठरतात किंबहुना त्यानेच ते खरे करून दाखवलेत. सचिननं वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याला १५नोव्हेंबर १९८९ला कराचीत भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात संधी मिळाली. या सामन्यातला सहभाग त्याला परमोच्च आनंद देणारा ठरला. सामन्यात त्याला टेस्ट कॅप मिळाली आणि सचिन भारतीय संघाचा अधिकृत फलंदाज झाला. पण या सामन्यात त्याला फलंदाजीस वाव मिळाला नाही.

६ मार्च १९९०ला वेलिंग्टन इथल्या न्युझीलंडविरूध्दच्या सामन्यात एक धाव नोंदवत त्यानं आपल्या धावांची सुरवात केली. खेळण्यास सुरवात केल्यानंतर बरोबर २वर्षानंतर१९९२ला त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर त्यानं पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या धावांच्या सरासरीकडे लक्ष दिल्यास प्रत्येक वर्षी साधारणतः एक हजार धावा जमा करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवलेले दिसते.एवढेच नव्हे तर हे उद्दीष्ट साध्य करायचंच या ध्येयानं तो आपली खेळी करतांना दिसतो.

कसोटी कि एकदिवसीय सामना अर्धशतक,शतक झळकवत त्यानं आपली घौडदौड सुरुच ठेवली. पाकिस्तान,न्युझीलंड,आँस्ट्रेलिया,इंग्लड..अशा सर्वच प्रतिस्पर्ध्याविरूध्द त्यानं कौतुकास्पद कामगिरी केली. केवळ आपल्या धावा वाढवण्याकडं अथवा फक्त कारकीर्दीकडं सचिननं कधीही लक्ष दिले नाही.संघ अडचणीत असतांना एक खांबी तंबूसारखा मैदानावर थांबणारा सचिन टीम इंडियाला नेहमीच आधार वाटलायं. किंबहुनां त्यांच्या सर्वीत्तम खेळीनंच भारतीयाला अनेकदा विजय मिळवून देत हे सिध्दही केलंय. दहा,पंधरा हजारांनंतर ५ नोव्हेंबर२००९ ला त्यानं पुर्ण केलेल्या १७हजार धावा हे त्यांच्या खेळाचं वेगळेपण म्हणता येईल.

सचिन आता थकलाय,त्यानं निवृत्त व्हावं या सल्लाला सचिननं एकदिवसीय सामना,कसोटी असो की टवेंटी-२० अशा सर्वच सामन्यात सर्वीत्तम खेळ करत चोख प्रत्युत्तर दिलंय. सचिन आपल्या मित्रपरिवारात तेंडल्या,लिटल चॅम्यियन्स या टोपन नावानं ओळखला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी आहार त्याला घ्यायला आवडतो. मराठीबरोबरच इंग्रजी,हिंदी भाषा त्याला येतात. साहस,रहस्यमय कथा वाचण्यांबरोबरच चित्रपट पहायला त्यांला आवडते. जुनी गाजलेली हिंदी,मराठी गाणी ऐकणे हा त्यांचा छंद आहे. याशिवाय स्कुबा डायव्हींगसह साहसी खेळात सहभागी व्हायला त्याला नेहमी आवडते.

अनेकदा भारतीय संघातल्या सहकाऱ्यांबरोबर हे खेळ खे्ळायला तो प्राधान्य देतो. विश्व विक्रमांचे डोंगर रचणाऱ्या सचिननं गर्व,अहंकाराला आपल्यापासनं दूरच ठेवलंय. आक्रमकतेपेक्षा संयमाला प्राधान्य द्यायला त्याला आवडते. क्रिकेटरसिकांना त्यांच्या खेळातून हा प्रत्यय नेहमीच आलायं. सचिन कुंटुबवत्सलही आहे. क्रिकेटचा दौरा नसेल त्यावेळेस आपला जास्तीत जास्त वेळ तो कुटुंबास देतो. आपल्या कारकीर्दीचा २० वर्षाचा टप्पा त्यानं गाठलायं. सचिननं कायमच खेळत राहावे,विक्रमाचे असेच डोंगर रचावेत अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

Sunday, October 11, 2009

राज,उध्दवची कम्युनिटी वाढतेय
शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे निगर्वी,सालसं आणि ध्येय निश्‍चीत करून शांतपणे मार्गक्रमण करणारा नेता... तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोख ठोक भूमिका मांडणारा,काहीसा संतापी परंतु आपल्याला हवी असलेली कृती करूनच घेणारे,ती करण्यासाठी भाग पाडणारे,ध्येयवादी व्यक्तीमत्व म्हणून परिचित......ही दोन्ही व्यक्तीमत्व चालणं,बोलणं,वागण्यापासून सर्वच बाबतीत भिन्न. त्यांच्याप्रमाणंच त्यांचे चाहतेही अर्थात "फॅन्स'भिन्न असणं स्वभाविक आहे. राज आणि उध्दवच्या चाहत्यांची स्वतंत्र कम्युनिटी असून या कम्युनिटीवरील सदस्यां(मेंबर)च्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या दिड-दोन महिन्यांत आपण विविध संकेतस्थळाच्या कम्युनिटीवर नजर टाकल्यास निवडणूकींमुळे सदस्य संख्येचा आलेख वाढता वाढता वाढे...असाच राहिला आहे हे लक्षात येईल.राज्यातले कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवायचाच. हे ध्येय शिवसेना-भाजपा युतीने समोर ठेवला आहे. त्याचदृष्टीने प्रचाराची रणनिती निश्‍चीत करत युतीचा राज्यभर प्रचार सुरु आहे.
दुसरीकडे नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणूकीत नवे असूनही चांगले यश मिळवले. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेत घवघवीत यश पक्षाला मिळेल. किंबहुना कोणत्याही पक्षाला मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्‍य नाही,ंअसा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आहे. प्रचारासाठी केवळ तिनच दिवस शिल्लक राहिल्याने जास्तीत जास्त भागात प्रचारासाठी जाण्यावर युती आणि मनसे नेत्याचा भर आहे. मतदानाच्या दिवशीचे मतदान आणि मतमोजणीनंतरचा कौल हे अद्याप दूर आहे. असे असलेतरी राज आणि उध्दवचे फॅन त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे शक्‍य नसल्याने स्क्रॅंप,चॅटींगद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. राज आणि उध्दव यांना आपल्या फॅनसला उत्तर देणं हे सध्याच्या निवडणूका रणधुमाळीत आजमितीस शक्‍य नाही. पण आपल्या फॅनचा हिरमोड होऊ नये. तसेच आपण त्यांच्या संपर्कात आहोत. हे दाखवण्यासाठी शिवसेना,मनसेने स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्यांच्या प्रश्‍नांना उत्तर दिले जाते. त्यांच्या सूचना,शुभेच्छा,प्रस्ताव स्विकारले जात आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फक्त आँकुर्टवरील कम्युनिटीचा विचार केला तर ही कम्युनिटी बरीच जुनी आहे. राज ठाकरे एमएनएस(18हजार234 सदस्य),राज ठाकरे मराठी हदयसम्राट(26,512)राज आँकुर्ट सेना(12,438),राज ठाकरे एक वादळ(11हजार908) याशिवाय फक्त राज ठाकरे नावाचे स्वतंत्र पाच फॅन्स क्‍लब असून त्यांच्या सदस्यांची संख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. "मुंबई आहे मराठी माणसाची, नाही कोणाच्या बापाची....ज्यांनी लावली महाराष्ट्राची वाट, ते काय आणणार नवीन पहाट,सत्तेसाठी सातशे साठ,महाराष्ट्रासाठी एकच मराठी हदयसम्राट राज ठाकरे...यासारखे संदेश कम्युनिटीवर फॅन्स क्‍लबने दिलेले आहेत. मनसेची "डब्लू डब्लू मनसे ओराजी" ही स्वतंत्र वेबाईट आहेत त्याचे1हजार454 सदस्य आहेत."महाराष्ट्राचा सन्मान राखा,आम्ही तुमचा मान ठेवू,अन्यथा तुम्ही जाता तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा...आपला मुंबईकर असा संदेश दिलेला दिसतो. मनसे विद्यार्थी सेनेचे1हजार272 सदस्य आहेत. "जगाला हेवा वाटेल,असा महाराष्ट्र घडवूया' हे राज ठाकरेंचे आवाहन युवकांसाठी ठळकपणे दिले आहे. याच आवाहनाला युवकांनी प्रतिसाद देत मनविसेच्या झेंड्याखाली अनेक युवक एकत्र झाल्याचे त्यांच्या फॅन्स क्‍लबच्या वाढत्या संख्येहुन लक्षात येत आहे.राज ठाकरेंप्रमाणेच शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंही आपल्या फॅन्सच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या दैनंदिन नियोजनावरून दिसते. आँकुर्टवर उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे मोठे सहा ग्रुप आहेत. या ग्रुपच्या सदस्यांची संख्या सात ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. यातलाच सातवा फॅन्सचा ग्रुप हा बाळासाहेबांबरोबर असलेल्या राज उध्दव यांना माननारा आहे. या ग्रुपचे सदस्य कमी असलेतरी त्यांचे संदेश लक्ष वेधतात. उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे संदेशही वेगळेपण जपणारे आहे. एका चाहत्यांने युतीच्या नव्या सरकारची अपेक्षा व्यक्त केलीय. तो म्हणतो"येणार या महाराष्ट्रात आता शिवशाही येणार,आता ज्यांची वेळ भरली, त्यानेच आडवे यावे,उध्दव ठाकरे...आपल्या काका-मामाची मिमिक्री करून मोठा झालेला हा नेता नव्हे, या नेत्याकडे स्वतःची ओळख आहे,ताकद आहे... असं वर्णन आहे. काहीं चाहत्यांना उध्दव हे चांगले राजकारणी आणि महाराष्ट्राला दिशा देणारे नेते वाटतात.काहींनी राजकारण हा त्यांचा पिंड नाही, ते लाजाळू आणि शांतपणे एकांतात रमणारे कलाकार आहे, त्यांची आपली फोटोग्राफी कला जोपासावी असे वाटते तर काहींना बाळासाहेबानंतरचा चांगला नेता म्हणून तेच योग्य असल्याचं वाटते.राज आणि उध्दवच्या या कम्युनिटवर चाहत्यांनी आपआपल्यापध्दतीने संदेश नोंदवत आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत. या दोन्ही नेत्यांना हे संदेश भविष्यातल्या राजकारणाला भरारी,प्रोत्साहन देणारेच ठरतील यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपली कम्युनिटी अपडेट ठेवण्याबरोबरच वेबसाईटही अपडेट ठेवण्यावर भर दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या फेसबुक,हाय फाय,व्हॅंनसारख्या कम्युनिटीवरही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन सभा,वार्ताकंनाच्या बातम्या,ठळक नोंदणी, मान्यवरांचे संदेश,छायाचित्र,व्हीडीओशुटींग सर्व काही उपलब्ध करून दिलेले दिसते. त्यासाठी आयटी क्षेत्रातला स्वतंत्र ग्रुपच तिथे काम करतो आहे. हे नमूद करावेसे वाटते.--- वुई हेट राज ठाकरे
....महाराष्ट्र नवनिर्माणचे स्वप्न पाहणाऱ्या किंबहुना त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंना पाठींबा देणारा स्वतंत्र वर्ग जगभर आहे. तसा त्यांचे विचार न पटणारा,त्यांचा विचारांना विरोध करणारा वर्गही असल्याचं जाणवते. त्यांना विरोध दर्शवणाऱ्या आँकुर्टवर वुई हेट राज ठाकरे(1हजार539सदस्य),आय हेट राज ठाकरे(1हजार156)आँल हिंदुस्थान हेट राज ठाकरे(831सदस्य) या कम्युनिटी आहेत. त्यांच्यावर आपआपल्यापध्दतीने संदेश देण्यात आले आहे."वुई सपोर्ट राज ठाकरे या कम्युनिटीवरील1हजार 219 सदस्यांनी राज ठाकरेंच्या बाजूने आहेत. त्यांच्या विचाराने हे सदस्य प्रेरीत झालेले दिसतात

कुणी आपला... कुणी परका...एकाच माळीचे मळी

आपला....कुणी परका....सगळे एकाच माळीचे मणी...
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली. पण देश,राज्यातले गरीबी निर्मुलन, महागाई,भ्रष्टाचार,बेकारी यासारखे अनेक प्रश्‍न जैसे थे आहे.उलट दिवसागणिक या प्रश्‍नांची संख्या वाढत आहे. भूकेल्यांसाठी अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहेत. या गरजा सोडवण्यासाठी केंद्र-राज्यांच्या योजना अनेक आहे. त्याचे नियोजन नसल्याने यशस्वी अमंलबजावणी होत नाही. त्यात अनेक पळवाटा आहेत त्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच राहतांना दिसतात....सरकारची टर्म संपते...पाच वर्षानी निवडणूका येतात....पुन्हा तेच पक्ष,तेच नेते...बेकारी,भ्रष्टाचार,गरीबी दुर करण्याची तीच पोकळ अश्‍वासने...सोडवण्याचे काही नियोजन नाही.....सारं काही तेच तेच मग मतदान करायचे कशासाठी असा प्रश्‍न नागरीकांना पडला तर त्यात नवल नाही.... होय हे खरं आहे पक्ष,नेत्यांबद्दल असलेला संताप त्यांच्या संवादातून जाणवतो...केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातल्या विविध जिल्ह्यात आलेले चाकरमानी मतदानासाठी आपल्या गावी न जाण्याचा प्रश्‍न यंदाही ऐरणीवर आहे.राज्य घटनेने प्रत्येक नागरीकांला मतदानाचा हक्क दिला आहे. या आपल्याला मिळालेल्या हक्कांचा योग्य वापर करून पात्र उमेदवार निवडून देणे आवश्‍यक आहे. नागरीकांनी मतदान करावे.यासाठी निवडणूक आयोगापासून विविध सामाजिक संस्था,मंडळे,वृत्तपत्र समुह जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन करतात. या आवाहनालाप्रतिसाद देत अनेक नागरीक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. पण समाजात असाही एक वर्ग आहे की,ज्याला राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार,घोषणा याबद्दल काही देणे घेणे नाही. हा वर्ग आपल्या व्यवसाय,कामातच अधिक लक्ष देतो. यात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित नागरीकांचाही तितकाच सहभाग असतो असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळं स्वभाविकच मतदान कमी प्रमाणात होते. गेल्या काही वर्षातल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला मिळालेला हा मुलभूत हक्क नागरीक का नाकारतात...याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोलण्यातून हे जाणवते. मुंबईत पनवेल भागात उपहारगृह चालवणारे किसन तेलुरे,सुलोचना तेलुरे हे दाम्पत्य मुळचे बिड जिल्ह्यातले. गेल्या बारा वर्षापासून ते मुंबईत आहे. पण एकदाही मतदान करण्यासाठी आपल्या गावी गेले नाही अथवा मुंबईतही मतदान केले नाही. गावाकडे असतांना केव्हातरी मतदान करायचे पण आता टाळतात. पक्ष,नेत्यांबद्दल त्यांच्या मनात चिड आहे. निवडून कुठलाही पक्ष येवो, काही फरक पडत नाही, महागाई,बेकारी वाढते आहे. सर्व सारखेच आहे असं त्यांना वाटते. कळंबोली कॉलनीतला गफूर सैय्यद बुलढाण्याचे आहे. भंगारव्यवसाय सुरु करून त्यांनी आपला जम बसवला आहे. सैय्यद परिवाराला निवडणूक,राजकारण हे विषय आवडत नाही. आपले प्रश्‍न आपल्यालाच सोडवावे लागणार आहे त्यासाठी नेते,पक्ष थोडेच येणार आहे, त्यामुळे मतदान वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. निवडणूकीपुरते पक्षाचे नेते येतात,अश्‍वासन देऊन निघून जातात आणि नंतर कधी फिरकत नाही. त्यामुळं मतदान नकोच असे गफूरभाई सांगतात. याच भागातले हातगाडीवर व्यवसाय करणारे राजाराम जाधव हे मूळचे धुळ्याचे. त्यांनाही राजकारणबद्दल प्रचंड चिड आहे. पक्ष,नेते म्हणजे ढोंगीपणा आहे.ढोंग करून सत्ता,पैसा मिळवायचा आणि त्यांचा उपयोग आपल्या परिवारासाठी करायचा असे त्यांचे म्हणणे आहे. आपला व्यवसाय बंद ठेवून मतदान करण्यासाठी गावाकडे जाणे त्यांना पसंत नाही. नावडे भागातल्या एका पतसंस्थेत काम करणाऱ्या ललित शुक्‍ल या सुशिक्षित युवकांच्या भावना तीव्र आहे. स्वातंत्र्याला साठ वर्ष पुर्ण झाली. पण देश,राज्यातले मुलभूत प्रश्‍न काही सुटले नाही, उलट बेकारी,महागाई,भ्रष्टाचार वाढला. या सर्व बाबींना पक्ष,नेतेच जबाबदार आहे. त्यामुळे भारताचा पुरेसा विकास झालेला नाही असं त्याला वाटते. सध्या राजकारणात नेतेमंडळीच्या परिवारतल्या प्रवेशाबाबत त्यांना नापसंती व्यक्त केली. या काही प्रातिनिक प्रतिक्रीया आहेत. पण समाजात असे अनेक घटक आहे. त्यांना राज्यकर्ते,नेते,पक्ष त्याचे विचारांबद्दल अनास्था आहेत. यात विशेषतः सामान्य नागरीकांबरोबरच बाहेरगावाहुन आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मतदान करण्याबद्दल जनजागृतीचे प्रयत्न अधिक व्हायला हवेत. मतदानापासून दुर राहणारा हा वर्ग मतदानाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी सरकारदरबारी अधिक प्रयत्न व्हावेत असाही सूर व्यक्त होऊ लागलायं. नागरीकांत नेते,पक्षाबद्दल अनास्थेची भावना निर्माण होणे हे चूकच आहे. त्यासाठी नेते,पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची आज गरज आहे असे वाटते.

Thursday, June 25, 2009

रबडी महात्म्य ढोली आणि ठेपला

वेळ पहाटे चार साडेचारची...ठिकाण अबू रोड अर्थात माऊंट अबू रेल्वेस्टेशन...रणकपूर एक्सप्रेस स्थानकावर थांबते आणि बाहेर एकच गोंधळ सुरु होतो...साहब ले लो अबू की फेमस रबडी...एक बार लेंगे तो बार बार मागोंगे..मुक्त मै घर ले जायेंगे...पसंद आयी तो दोन बार आयेंगे..अच्छी नही लगी तो दाम ले जावोंगे...यासारख्या विक्रेत्यांच्या घोषणांनी प्लॅटफार्म गजबजून जातो....कुल्लाहात असलेली रबडी...प्रत्येक बोगी आणि खिडकीजवळ जाऊन विक्रीचा त्यांचा सपाटा सुरु होतो...प्रवाशांना पटवून रबडीचा कुल्लाह त्यांच्या हातात देत पैसे घेतल्यानंतरच विक्रेत्याचं समाधान होते...एवढ्या पहाटेही विक्रीचा हा अनोखा फंडा लक्षात घ्यावा असाच वाटला...इंटरनॅशनल मिडीया कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्या राहणीमानाबरोबरच अस्सल खवैय्यगिरी जपणारेही अनेकजण पहायला मिळाले.
बारा पंधरा तासांच्या प्रवासानंतर अबू स्टेशनवर पहाटे उतरलेल्या कुठल्याही प्रवाशाला आपला थकवा दूर करण्यासाठी चहा प्यावासा वाटेल. त्यातही महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल तर ती रबडीपेक्षा चहालाच अधिक प्राधान्य देईल. त्याप्रमाणे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. पण पहाटेची वेळ असूनही संपुर्ण स्टेशनवर आम्हाला कुठेच चहा मिळाली नाही. विक्रेत्यांकडे चहाबद्दल विचारणा केली तर ते तिरस्काराच्या भावनेनंच आमच्याकडे बघत.
काही विक्रेत्यांनी तर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत इतर ग्राहकांना रबडी देणं पसंत केल. स्टेशनवर सर्वत्र रबडी विकली जात होती. आमच्यापैकी काहींनी चाय नही तो रबडी सही...असं म्हणतं रबडी खायचं ठरवलं तर काहींनी रबडी आणि एवढ्या पहाटे असं म्हणतं खाण्यास नकार दिला. दहा रूपये देत रबडी घेत काहींनी स्वाद चाखायला सुरुवात केली. त्यांनी रबडी घेतल्यानंतरही विक्रेता समोर जाण्यास तयार नव्हता. तो आपल्या खास शैलीत रबडी महात्म्य सांगत इतरांना आग्रह करत होता. अखेर आम्हांलाही त्यानं रबडी घेण्यास भाग पाडले...आणि आम्ही पहाटेच्या वेळी चाखलेली रबडीची चव खरोखरच लक्षात रहावी अशीच होती...याबद्दल विक्रेता आणि सुरवातीस रबडी खाणाऱ्यां मित्रांचे आभार मानावे तेवढे थोडेच..त्यांचे चाय नही तो रबडी सही... हे वाक्यही माझ्या लक्षात राहिले.
पाच दिवसीय परिषद आटोपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रजापिता ईश्वरिय विश्वविद्यालयातर्फे आम्हाला मका चिवडा,शंकरपाळे पाकिट आणि काजू बर्फी ही ईश्वरीयभेट म्हणून देण्यात आली. या भेटीलाच ढोली अर्थात एकत्रित प्रसाद म्हणतात हे आम्हाला पाहिल्यांदा समजलं. सहभागी प्रतिनिधींना प्रवासात सहभोजनासाठी पुरी,खाकरा,बटाटा चिप्स आणि त्याजोडीला लोणच्याचे विविध प्रकार असलेले पाकिट देण्यात आले. या खानासुमारीला ठेपला असं म्हणतात. रबडीवगळता ढोली,ठेपला ही वाक्ये आमच्यासाठी नवीनच होती...या सर्व नव्या खाद्यपदार्थाचा परतीच्या प्रवासात आम्ही आस्वाद घेतला..या पदार्थाची चव ओठावर ठेवतच आम्ही घरी परतलो पण राज्य बदलल्यानंतर जात,धर्म,पंथ आणि खानपानही बदलते आणि ते कसं असू शकत याचा प्रत्यय आम्हाला राजस्थान जयपूर दौऱ्यादरम्यान आला...

Tuesday, June 23, 2009

ओमशांती...थिंक ओव्हर इट

मै एक आत्मा हु...ज्योती बिंदू स्वरूप आत्मा हु...आप के मस्तिष्क के बाजू मै ब्रुगटीके पास मेरा वास्तव है....हम सब परम् परमात्मा की संतान है...यासारखे काहीसे जड परंतु अध्यात्मिक शब्द कानावर पडले की,क्षणभर कुणालाही ही काय भानगड आहे. असंच वाटणं स्वभाविक आहे. पण ही भानगड वगैरे काही नाही, तर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत असलेल्या भारतात अध्यात्मिक विचाराचा डोस(संदेश) देण्याचा एक प्रकार म्हणता येईल. एक अध्यात्मिक चळवळ म्हणून परिचित असलेल्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे माऊंटअबू राजस्थान इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी इनर इम्पावरमेंट आँफ मिडीया पर्सन ही राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेत ओम शांती....या वरील डोसची जणू अनुभूती आली.
जगात धर्म,जात,मुर्तीपूजा,पंथ वगैरे काही नाही. मनुष्य हा देखील फक्त निमित्तमात्रा आहे. तो जे काही काम करतो,चालतो,बोलतो,लिहितो,वाचतो या सर्व कृती त्यांच्या आत्म्याकडून होतात. आत्माच मनुष्याकडून सर्वकाही करून घेत असतो. असं सांगणारं हे विश्वविद्यालय. देशविदेशात आठशेहुन अधिक केंद्र आणि जवळपास आठ हजारांहुन अधिक बीके(ब्रम्हाकुमार,ब्रम्हाकुमारी)च्या माध्यमातून चालणारे काम सर्वांनाच थक्क करून सोडणारे आहेत. मला दुसऱ्यांदा या मिडीया कॉन्फरन्सला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं हे विश्वविद्यालय अधिक जवळून समजून घेता आलं.

यंदाच्या परिषदेसाठी प्रसारमाध्यमातल्या कर्मचाऱ्याचे अंतरिक सक्षक्तीकरण हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने विविध विषय चार दिवस चर्चेले गेले. त्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीची आत्मानुभूती, प्रतिनिधीची अधात्मिक ज्ञान, त्यातला सहभाग आणि अध्यात्मिक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्रसारमाध्यम क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीची सुत्र,आनंद प्राप्तीसाठी परमेश्वराशी एकरूपता,जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंतरिक शक्तीची आवश्यकता,सक्षम प्रसारमाध्यमे समाजासाठी प्रेरक,समय की पुकार या सारख्या विषयांचा समावेश होता. याशिवाय चारही दिवस पहाटे चार ते साडेपाच पर्यत विपश्यना,ध्यानधारणा होत असे. त्यानंतर साडेसहा ते साडेआठ यावेळेत राजयोगावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या चार दिवसीय परिषदेसाठी देशभरातून नावाजलेल्या प्रिंट,इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक,वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. सहभागी वक्तेही संबंधीत विषयाचे तज्ञच होते. त्यामुळं प्रत्येक चर्चाही खुलेपणे आणि बारीकसारीक मुद्यांवर होत असे. पण सर्वच तज्ञ विश्वविद्यालयाशी संबंधीत असल्यानं चर्चेचा सूर हा विश्वविद्यालयांनं आखून दिलेल्या चौकटीत आणि प्रत्येक विषयात अध्यात्मिक टच दिलेला असल्याचे जाणवले.
पहिल्या दिवसाचा शानदार उद्घाटन सोहळा.समारोप समारंभही भव्यदिव्य असाच,त्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमानं परिषद संस्मरणीय झाली.परिषदेच्या निमित्तानं प्रतिनिधींना विश्वविद्यालयानं माऊंटअबूवरील नक्कीलेकसह त्यांच्या उपक्रमांपैकी गोल्बल हॉस्पिटल,पांडव भवन,युनिव्हर्सल हॉल,शांती भवन,म्युझियम,पिस पार्क दाखवले. वर्षभर रावबण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहीती दिली.
आरवली पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या आणि ब्रम्हाबाबांनी स्थापन केलेल्या या ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम निश्चितच चांगला आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र आणून त्यांच्या क्षेत्रातल्या बदलांची माहीती देण्याबरोबरच अध्यात्मिक टच देण्याचा प्रयत्न केला जातो. तिथलं निसर्गसौदर्य पाहण्याबरोबरच आदरातिथ्यापासून इतर सर्वचबाबतीतल्या नियोजनाचा इतरांनी आदर्श ध्यावा असाच आहे. हे जरी खरं असलंतरी मला परिषदेत खटकलेले काही मुद्दे अनुत्तरीतच राहिले. त्यात कुठलाही धर्म,जात,पंथ,मुर्तीपूजा न मानणाऱ्या या विश्वविद्यालयालयात प्रतिमापूजनाला स्थान आहे, जगात देव नाही आपला आत्मा सर्व काही करून घेतो , ब्रम्हदेवानं विश्वाची निर्मिती केली आहे म्हणून ब्रम्हा बाबा हेच परमपिता, श्रीकृष्णाने गीता सांगितली नाही,अर्जुनाचे अनुकरण स्वइच्छेवर, संत ज्ञानेश्वर,शंकराचार्यांनी ज्ञानोपदेश केला नाही यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. प्रत्येक धर्माची शिकवण सदाचार,सत्य,अहिंसेची मग जगात धर्मच नसल्याचे विश्वविद्यालयाचे म्हणणे कितपत योग्य, जगभर पसरलेल्या विश्वविद्यालयाच्या कारभारासाठी आर्थिक मदत संयुक्त राष्ट्र संघासह इतरांकडून केली जाते. याशिवाय विश्वविद्यालयाच्या कार्यासाठी पुर्णवेळ वाहून घेतलेले बीके अर्थात ब्रदर्स अँन्ड सिस्टरर्स आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज जगभर परमपिता ब्रम्हाबाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला जात आहे....हे जरी खरं असलं तरी काही प्रश्न हे अनुत्तरितच राहतात. परिषदेदरम्यान मी संयोजकांशी या विषयावर चर्चा करण्याचा,शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.....विश्वविद्यालयाचा आठ दिवसांचा कोर्स करा मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळतील...एवढंच सांगण्यात आलंय....अखेर हे अनुत्तरित प्रश्नच मनात ठेवून मी पुन्हा नाशिकला परतलो...

Tuesday, June 9, 2009

(टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू व पंच कमलेश मेहता यांनी सकाळ साम टिव्हीला विशेष मुलाखत दिली. ही मुलाखत सकाळच्या सर्व आवृत्यांसह ई सकाळवर प्रसिध्दी झाली. माझ्या मित्रांना वाचनासाठी पुन्हा देत आहे....)
खेळाडू विकासासाठी क्रीडा धोरणाची योग्य अंमलबजावणी हवी
श्रीकृष्ण कुलकर्णी
मुंबई - दरवर्षी केंद्र, राज्य शासन क्रीडा विकास डोळ्यांसमोर ठेवून आपल्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करते. ही रक्कम मोठी असल्याने त्याच प्रमाणात घोषणाही केल्या जातात; पण या तरतुदीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी निश्‍चित केलेला निधी कितपत खर्च होतो की तसाच राहतो, हे कुणालाही समजत नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. अशी अपेक्षा टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक कमलेश मेहता यांनी व्यक्त केली. सध्या सर्वच खेळाडू विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. सरकारचे योग्य पाठबळही मिळायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले.


जलतरणपटू वीरधवल खाडे याने कर्नाटककडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर कमलेश मेहता यांची माटुंगा जिमखाना येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वीरधवलच्या निर्णयाबरोबरच इतर विषयावर 'साम मराठी'शी संवाद साधला. केंद्र, राज्य शासनाचे क्रीडा धोरण हे खेळाडू विकास डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवे. केवळ अंदाजपत्रकात भरीव तरतुदी करून भागणार नाही. तसेच योग्य तरतुदीबरोबरच अंमलबजावणी होण्यासाठीही नियोजन केले पाहिजे. आमच्या वेळी विशेष पुरस्कार वगैरे काही नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश नोंदविल्यानंतर कधी तरी सत्कार केला जाई. मला तर एकदाच रोख रक्कम मिळाली होती. आज सर्वच क्रीडा प्रकारांत नामवंत खेळाडू पुढे येत आहेत. आपल्या कामगिरीने महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत; पण त्यांच्या या कामगिरीच्या तुलनेत त्यांना देण्यात येणारी रक्कम इतर राज्यांच्या तुलनेत फार तुटपुंजी आहे. त्या बक्षिसांच्या रकमेत वाढ व्हायला हवी.समस्यांच्या गर्तेत खेळाडूते म्हणाले, "प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, क्रीडा संस्था, क्‍लबची संख्या वाढली आहे. या संस्था, क्‍लबकडे पुरेसे साहित्य नाही. खेळाडूही उपलब्ध होत नाहीत. संस्था, क्‍लबच्या स्तरावर चांगली वातावरणनिर्मिती होत आहे; पण महागडे क्रीडासाहित्य आणि संस्था, क्‍लबचे शुल्क देणे खेळाडूंना परवडत नाही, त्यामुळे काही खेळाडू स्वतंत्रपणे खेळण्यास प्राधान्य देतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. शासन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून या सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन खेळाडूंना उपलब्ध करून देऊ शकते. फक्त क्रीडा खात्याने कामाची मानसिकता बदलून खेळाडूंचा हुरूप वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''शेवटी कौटुंबिक जबाबदारी महत्त्वाचीकुठलाही खेळाडू हा लहानपणापासून एखाद्या खेळाची निवड करून त्यात नैपुण्य मिळवतो, असे सांगत ते म्हणाले, बारा-पंधरा वयापर्यंत खेळल्यानंतर त्याला बक्षिसे मिळतात. तो प्रसिद्धीच्या झोतात कायम राहतो. त्यामुळे त्यांचा हुरूप जरूर वाढतो; मात्र सतरा-अठरा वर्षांनंतर त्यांना नोकरीचे वेध लागतात. कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने आपल्याला खेळांच्या माध्यमातून नोकरी मिळावी, असे त्यांना वाटते. यात चूकही काही नाही; पण त्यांना नोकरी मिळत नाही. आज एअर इंडिया, बॅंका, पोलिस, रेल्वेचा अपवाद वगळता इतर ठिकाणी खेळाडूला नोकरीची संधी नाही. सरकारी पातळीवर तर पूर्णपणे अनास्था आहे. सर्वच खेळाडूंना नव्हे; पण राष्ट्रीयस्तर गाजविणाऱ्या खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावल्यास इतरही खेळाडू क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होण्यास मदत होईल, असे वाटते.


अपेक्षापूर्ती हवी, अपेक्षाभंग नको...सरावासाठी योग्य मैदान, चांगला खेळ होण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक, कुटुंब उदरनिर्वाहासाठी नोकरी, खेळाच्या आर्थिक मदतीसाठी प्रायोजक... अशा काही समस्या प्रत्येक खेळाडूंच्या आहेत. किंबहुना सर्वच खेळाडू हेच मुद्दे लक्षात घेऊन आपल्या खेळाची निवड करतात. चांगली कामगिरी बजावितात. त्यामुळे त्यांच्या क्‍लब, संस्था आणि शासनाकडून अपेक्षा वाढतात. आपल्या मागण्या क्‍लब, शासनाने ऐकूण घ्याव्यात. त्याप्रमाणे अंमलबजावणी करून आपल्याला चांगली मदत करावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटते. खेळाडूंच्या अशा अपेक्षांची पूर्तीच व्हायला हवी. उगीचच पोकळ अश्‍वासने देऊन खेळाडूंचा अपेक्षाभंग करू नये, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

Wednesday, June 3, 2009

दातृत्व आणि सचिन

आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हा उदात्त हेतू समोर ठेवून गरीब, पिडीतांसाठी मदत करणारे आणि कायम प्रकाशझोतात राहणाऱ्यांची संख्या मोठीच. मात्र गाजावाजा न करता इतरांना सतत मदत करणारी व्यक्ती म्हणजे आपला लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.... त्यानं 'गिव्ह इंडिया' या संस्थेला गरीब, पिडीतांसाठी ७० हजार ७०० रूपयांची मदत केलीय. याशिवाय दोनशे अनाथ मुलांचा शिक्षण, पालनपोषणाचा खर्चही तो उचलणार आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं गिव्ह इंडिया ही संस्था गेल्या नऊ वर्षापासून काम करतेय. ही संस्था मुंबई,दिल्ली मॅरेथाँनचं यशस्वी नियोजन करते. तसंच त्यातून जमा होणारा निधी विविध स्वयंसेवी संस्थांना गरिब,पिडीत कुटुंबांसाठी उपलब्ध करून देते. गिव्ह इंडिया या संस्थेतर्फे यंदा२७सप्टेंबर ते तीन आँक्टोबर या कालावधीत देणगी द्या आणि आनंद मिळवा अर्थात जॉय आँफ गिव्हींग विक हा आठवडा पाळला जाणार आहे. या आठवडयात लहान मुलं,कुटुंब,पालक,पिडीतांना समोर ठेवून विविध कार्यक्रम होणार आहे.
सचिननं मदत देत या आठवड्यांची औपचारिक सुरवात केलीय. समाजात गरिब,पिडीत माणसांची संख्या मोठी आहे. पण त्यांच्यासाठी काम करणारे कमी आहेत. एक भारतीय नागरीक म्हणून इतरांसाठी मदत करणं हे आपलं कर्तव्यच असल्याचं त्यानं सांगितलं. इतरांना मदत करण्याची प्रेरणा आपल्याला वडील आणि पत्नी यांचेकडून मिळाली.असं सांगायला तो विसरला नाही.
वंचितांसाठी काम करायला वेळ कुणालाच नाही. पण सहानुभूती ठेवून अन्न,कप़डे,प्राथमिक उपचारांसाठी मदत आपण करू शकतो.असं अभिनेत्री नंदिता दास हिनं सांगत. वंचितांसाठी प्रत्येक व्यक्तींन मदत करून खारीचा वाटा उचलावा.असं आवाहन तिनं केलं.
मदत करण्याची इच्छा असूनही केवळ योग्य व्यासपीठ न मिळाल्यानं अनेकजण देणगी देणं टाळतात. याच लोकांना समोर ठेवून ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणाऱ्या गिवनं इंडियानं वंचित,पिडीतांसाठी घेतलेला पुढाकार घेतलाय. देणगी द्या आणि आनंद घ्या...अशा घोषवाक्यांद्वारे संस्था पुढे आली. बघूया या संस्थाना दात्यांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो

Monday, June 1, 2009

मंत्रिमहोदयाचे सर्व काही छंदासाठी.....

प्रत्येक माणसाला काहीतरी छंद असतो. याला मंत्री, खासदार तरी कसे अपवाद असतील... व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यासाठी चांगला पेहराव घालणं, खाणंपिणं, वाचन, पर्यटनाचा छंद जोपासणारे अनेक खासदार आहेत. प्रत्येकांची 'पसंत अपनी अपनी' असली तरी धावपळीच्या काळातही ते छंद जपतात. मंत्र्यांच्या या अजब छंदांवर टाकलेला एक दृष्टीक्षेप......
व्यक्ती मग ती कुठलीही असो, आपल्याला एखादा छंद जडला अथवा एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर ती पुर्ण करण्यासाठी धडपड करतात. अर्थात त्यातून मिळणारा आनंदही मोठाच असतो. खासदारांच्या आवडीनिवडी अशाच वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवलेले एस. एम. कृष्णा परराष्ट्रमंत्री झालेत. परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार आणि कपड्यांचं डिझाइन करणं याचा परस्परांशी काही संबंध आहे का? तर याचं उत्तर कृष्णा यांच्या बाबतीत निश्चीत -होय-असं आहे. कृष्णा यांना फावल्या वेळेत पुरुषांच्या कपड्याचं डीझाइन करण्याचा छंद आहे. अर्थात आता किती वेळ मिळतो हा प्रश्नच आहे. याशिवाय ते वाचनातही रमतात.
राष्ट्रवादीचे नेते,कॅबीनेट मंत्री शरद पवार यांना कार्यकर्ते आणि परिवारासोबत वेळ द्यायला जास्त आवडतं. क्रिकेटच्या गप्पा आणि क्रिकेट पाहण्यातही ते अनेकदा रमून जातात. त्यांचे विविध विषयांवरील वाचन दांडगे आहेत. याशिवाय संस्था आणि शेतीला भेट देऊन नवनवीन माहीती घ्यायला त्यांना आवडतं. आपला शाकाहारी आहारही ते जपतात.
कॉग्रेस कार्यकर्तापासनं राज्यपाल, कॅबीनेटमंत्रीपदापर्यतचा जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदेचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना लिखानाची विशेष आवड आहे. काव्यवाचन करायलाही त्यांना आवडते. याशिवाय स्वतःनाटकात काम केलेले असल्यानं परिवारासोबत नाटक,चित्रपट पहायला त्यांना आवडते. क्रिकेट सामना पाहण्यास ते प्राधान्य देतात.
बंगालमध्ये डाव्यांना धूळ चारणाऱ्या रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांचं व्यक्तीमत्व धडाडीचं आहे. त्यांना गाणी गायला आवडतं.आपली आवड व्यक्तीगत असल्यानं इतरांना त्रास होणार नाही. याची काळजी त्या घेतात. भविष्यात त्यांना पुस्तक लिहिण्याची इच्छा आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं वाचन अफाट आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. फावल्या वेळेत आपल्या जिल्ह्यात जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. दैनंदिन कामातून थोडा वेळ परिवाराला देतात.जुने चित्रपट पहायला त्यांना आवडते. रूचकर शाकाहारी, मांसाहारी जेवणाची त्यांना विशेष आवड आहे.
कॉग्रेसच्या मुख्य फळीतले जेष्ठ नेते वीरप्पा मोईली हे तर, राजकारणी असूनही प्रतिभावंत लेखक आहे. कन्नड भाषेत त्यांनी रामायण महानिर्वाणम् हे महाकाव्य लिहिलंय. ४२हजार२९५ ओळींचं हे महाकाव्य कर्नाटकांत लोकप्रिय आहे. त्याचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे.सध्या ते २०२०मध्ये महासत्ता होणारी भारताची अर्थव्यवस्था हा इंग्रजी ग्रंथ लिहीत आहेत.
गांधीवादी विचारसरणी माननारे कॉग्रेस नेते मुरली देवरा महाराष्ट्रात मुरलीभाई नावानं ओळखलं जातात. मितभाषी असलेले देवरा २५ वर्ष मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष होते. वेळेत काम पुर्ण करणे ही त्यांची खासियत, फावल्या वेळेत एखाद्या विषयाचं प्लॅनिंग करणं अथवा परिवाराला वेळ द्यायला त्यांना आवडतं.
स्वतंत्र कारभार सांभाणारे पृथ्वीराज चव्हाण लहानपणापासनं दिल्लीत. गांधी घराण्यांशी जवळीकतेचा फायदा झाला.परदेशात शिक्षण घेऊनही लहानपणापासूनं गावच्या मतदारांशी नाळ जोडलेला कार्यकर्ता म्हणून परिचित. वाचनांबरोबरच चविष्ट शाकाहारी पदार्थ खायला आवडते.
कार्पोरेट कल्चरशी जोडलेले,क्रिकेटवेडे प्रफुल्ल पटेल अत्यंत हुशार,देशविदेशातल्या उद्योजकांशी दांडगा संपर्क असलेले नेते आहेत. क्रिकेट सामना, चित्रपट, फॅशन शो पाहायला त्यांना आवडतं. उच्चविद्याविभूषित गुरुदास कामत परिवारांला सर्वाधिक वेळ देतात. कार्यकर्ते,मतदारांशी दांडगा संपर्क हे त्यांचं वैशिष्ठ. फावल्या वेळेत आगामी कार्यक्रमाचं नियोजन करायला त्यांना आवडतं. वसंतदादाच्या पुण्याईनं मंत्रीपद मिळालेले प्रतिक पाटीलयांना वाचन,टिव्ही पाहणं,कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आवडते.वर्षातून दोन-तीनदा परिवारासोबत बाहेर फिरायला ते जातात. काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा त्यांचा उद्देश आहे
मागच्या सरकारच्या काळात माहीती प्रसारणमंत्री असलेले आनंद शर्मा फावल्या वेळेत क्रिकेट खेळतात. याशिवाय थोडा अधिक वेळ असेल तर हायकिंगला जाणे ते चूकवत नाही. तरूण वयात ते नियमित हायकिंगला जात मात्र व्यस्ततेमुळं सध्या त्यांना मुरड घालावी लागत आहे.

हॉकी खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी धनराजचा पुढाकार

सोमवार,०१ जून,२००९ (ई-सकाळसह महाराष्ट्रातल्या सकाळच्या सर्व आवृत्यांला प्रसिध्द झालेली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते धनराज पिल्ले यांची मुलाखत आणि त्यासंदर्भात वाचकांच्या प्रतिक्रीया...खास ब्लॉगच्या मित्रांसाठी)
क्रीडा
हॉकी खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी धनराजचा पुढाकार
श्रीकृष्ण कुलकर्णी
Sunday, May 31st, 2009 AT 10:05 PM
मुंबई - हॉकी खेळाने भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत आठ वेळा अजिंक्‍यपद मिळवून दिले. हॉकी संघाची ही संस्मरणीय कामगिरी कुणीही भारतीय विसरू शकत नाही; पण गेल्या काही दिवसांपासून हॉकी मागे पडली आहे, असे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता धनराज पिल्ले याने मान्य केले. हॉकीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण हॉकी ऍकेडमी सुरू करणार आहोत. ऍकेडमीद्वारे खेळाडूंना मार्गदर्शन करून चांगले खेळाडू तयार करणार असल्याचे त्याने "साम मराठी'शी बोलताना सांगितले.

पनवेल येथे कालपासून राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी धनराज पिल्ले आला होता. त्यावेळी त्याने विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकला पात्र झाला नाही. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ""ऑलिम्पिकमध्ये संघ पात्र झाला नाही म्हणून संघाची कामगिरी खराब आहे, संघाची पीछेहाट होत आहे, असे म्हणणे मला मान्य नाही. गेल्या सात-आठ महिन्यांपासून संघाची कामगिरी सुधारत आहे. आता परदेशी प्रशिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ वाटचाल करीत आहे. याच कामगिरीच्या जोरावर संघ उद्या (1 जून) पासून होत असलेल्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. मला दोन वेळा संघाबरोबर व्यवस्थापक म्हणून जाण्याची संधी मिळाली. माझ्या मार्गदर्शनाखाली सुलतान अझलम शहा हॉकी संघाने चांगली कामगिरी केली.''...म्हणून पुढाकार घेत आहे
सध्या हॉकी संघाची कामगिरी खालावत चालली आहे असे मान्य करीत तो म्हणाला, ""आपल्याकडे नावाजलेले खेळाडू नाहीत. त्याचप्रमाणे त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. हे लक्षात घेऊनच हॉकीच्या प्रचार-प्रसारासाठी मी पुढाकार घेतला आहे. लवकरच हॉकी खेळाची स्वतंत्र ऍकेडमी सुरू करीत आहे. या ऍकेडमीद्वारे खेळाडूंना सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल.
''प्रसारमाध्यमांनी इतर खेळांकडे लक्ष द्यावे
तो म्हणाला, सर्व प्रसारमाध्यमे क्रिकेट खेळाला सर्वाधिक प्रसिद्धी देतात. क्रिकेटपटूंच्या प्रत्येक बारीक हालचालींना ठळक प्रसिद्धी दिली जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर दोन दिवसांपूर्वी रवाना झालेल्या भारतीय संघातल्या युवराज सिंगने बदललेल्या हेअरस्टाईलला सर्वांनी पसंती दिली. हे चुकीचे आहे. हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळालाही जास्त प्रसिद्धी द्यायला हवी. प्रसारमाध्यमांनी क्रिकेट, टेनिस, फुटबॉलबरोबरच इतर खेळांकडे लक्ष द्यावे, असे त्याने सुचविले. शासनाने खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्याने एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. हॉकी महासंघाचे अध्यक्ष के. पी. गिल यांना मंडळावरून हटविले. त्यांच्याबद्दल बोलण्यासही त्याने नकार दिला.
हॉकीच मरते दम तक...
हॉकीची पीछेहाट आणि त्याविरुद्ध क्रिकेटची लोकप्रियता हे लक्षात घेऊन क्रिकेटला राष्ट्रीय खेळाची मान्यता द्यावी का, या प्रश्‍नाला उत्तर देताना तो म्हणाला, हॉकी हॉकी आहे, हॉकीची तुलना अन्य खेळांबरोबर करणे गैर वाटते. प्रत्येक खेळ आपापल्या ठिकाणी आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून मरते दम तक हा खेळच राष्ट्रीय खेळ राहील यात शंका नसल्याच त्याने नमूद केले.
वाचकांच्या प्रतिक्रिया
On June 01st 9:06 AM, ashok vayavare said:
indian hocky barobarch maharashtra team kade leksh dayave hi eacha, dhanraj chagle kam kara
On June 01st 8:06 AM, nanasahab katre said:
hocky match pahavi ti india-pak,india_germany ya team chi pan aata purvicha khal pahayala milat nahi,changle player tayar hove, hich eicha
On June 01st 8:06 AM, keshiv deo said:
chan dhanraj...changli indian team tayar kara, best of luck
On June 01st 8:06 AM, vaishali said:
dhanraj, changla nirnay, pan, tumi khup agaodar pude aane aapkshit hote...thik aahe aata changle kam kara
On June 01st 8:06 AM, vijay jagtap said:
dhanraj, tumi paisa, prasidhache khup pude gelea aahat, aata maharashtra hocky kade laksh daya vi vinayanti...
On June 01st 8:06 AM, damyanti said:
dhanraj, tu eter vadat padu nako.fakth changle player ghadav, speciallly maharashtra kade aadik laksh de...hich shunbhacha
On June 01st 8:06 AM, ramesh kale said:
हॉकीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी धनराजचा पुढाकार चांगली गोष्ट आहे. पुन्हा हॉकी खेळ चुरशीचा पहायला मिळणार
On June 01st 8:06 AM, avinash jadhav said:
great dhanraj, aage bado,changle player ghadva, jai ho...





Saturday, May 2, 2009

सिरियसली थिंक ओव्हर इट


पंधराव्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशात सरासरी ४० ते ५० टक्के मतदान झाले. मतदानास मिळालेल्या या अत्यल्प प्रतिसादासाठी वेगवेगळी कारणे दिली जात आहे. त्यात रखरखीत उन्हाचा चटका, सलग चार दिवस मिळालेली सुट्टी यासारख्या कारणांचा समावेश आहे. पण खरोखरच मतदारांनी या दोन कारणांमुळं मतदान करणं टाळलं असेल का? कि राजकीय पक्षाबद्दल आपली असलेली नाराजी निवडणूकीत मतदान न करता व्यक्त केली असेल. या मुद्यांचाही राजकीय पक्ष,केंद्र राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे

पाच वर्षानी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीबद्दल सर्वानांच उत्सुकता असते. हे म्हणणं काहीस खरं असलंतरी ते आता मागे पडतांना दिसत आहे. यंदाच्या निवडणूकीपुर्वीही नेते,अभिनेत्यांनी जागो इंडियाची हाक देत किंबहुना तसं अभियान राबवत मतदान करण्याबद्दल समाजालगृती केली होती.विविध जाहिरातीच्या माध्यमातून राजकीय पक्षांनीही मतदान करण्याचं आव्हान केलं होतं मात्र त्याला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं दिसते.

मतदारांची उत्सुकता नव्हे तर अनुत्सुकताच जास्त दिसून आली.मुलभूत प्रश्न सोडवण्यास सर्व पातळीवर अपयशी ठरत असलेलं सरकारचं धोरण राजकीय पक्षाबद्दलची अनास्था,लायक उमेदवार नसणं यासारखे काही मुद्देही विचार करायला लावणारे आहेत. यंदाच्या निवडणूकीत मुलभूत प्रश्नांबरोबरच देशात झालेले बॉम्बस्फोट,भ्रष्टाचार,जागतिक स्तरावरील मंदी हे मुद्दे राजकीय पक्षांनी प्रचारांसाठी वापरले. तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानांचा मुंबई-ठाण्यापुरताच विचार केला तर उन्हाचा चटका आणि मतदान दिवसाची सुट्टी,कामगार दिन आणि त्यानंतर सलग शनिवार,रविवारची सुट्टी सर्वानांच मिळाली आहे. त्यामुळंच मतदारांनी बाहेर सहलीसाठी जाणं पसतं केलंय असं बोललं जातंय.त्याचीच गडद छाया मतदानावर उमटली हे टाळता येणार नाही.

गेले दोन-अडीच महिने राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांच्या जिवावार आणि ज्यांच्यासाठीच ही प्रचार मोहिम राबवली. त्यांनीच मतदान न करता मतदानकेंद्राकडं पाठ फिरवल्यानं नेते कार्याकर्त्यांचे चेहरं पाहण्यासारखे झाले होते. मुंबई ठाण्यात मतदानाची सरासरी टक्केवारी ही चाळीस ते ४९ टक्क्यांपर्यत राहीली. काही भागात तर फक्त तीस ते टाळीस टक्के एवढेच मतदान झाले.चार दिवसांच्या सुट्टीमुळं सहलीची ठिकाणी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्रहीने अनेक ठिकाणी पहायला मिळालं.जी मंडळी बाहेर फिरण्यासाठी गेली नाहीत ती उन्हामुळं घराबाहेरही पडली नाही. काही मोजक्याच केंद्रावर रांगा दिसल्या

एरव्ही लोकशाही प्रक्रियेबद्दल फारसा उत्साह न दाखवणाऱ्या सेलिब्रेटींनी मात्र मतदान करून आपण किती सजग असल्याचं दाखवून दिलं. आमच्या प्रश्नांकडं राजकीय पक्ष लक्ष देत नसेल,त्यासाठी पाठपुरावा करत नसेल तर आम्हालाही मतदान करण्याची गरज वाटत नाही....असंच कदाचित मतदारांच्या मनात आलं असावं....पण कारणं काहीही मतदारांच्या या भूमिकेबद्दल सर्वांनीच गांभिर्यानं विचार करायलाच हवा असं वाटतं.

केवळ पुर्वीपासून मतदानाची टक्केवारी कमी आहे,आमच्या भागात मतदान कमीच होतं. असं म्हणून राजकीय पक्षांनी,नेत्यांनी जबाबदारी झटकणं चूकीचं वाटतंय. अशी जबाबदारी झटकणं तो एक अक्षम्य गुन्हाच म्हणता येईल

Monday, April 6, 2009

`राज` उवाच....

शिवाजी पार्क इथं झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठी बाणा,हिंदुत्व यासारख्या वक्त्यांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला. आपल्यावर केलेल्या या वक्त्यांचा खुलासा करणार नाही,स्पष्टीकरण देणार नाही ते राज ठाकरे कसले...आणि त्यांनाही बोलतं न करणारी प्रसारमाध्यमं,पत्रकार तरी कुठले...अखेर सभेच्या दुसऱ्यांच दिवशी काल मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघानं घेतलेल्या वार्तालापात राज ठाकरे
बोलले...
शिवसेना,भाजप आणि शरद पवारांवर भरपूर बोलले आणि आपल्यापरिनं स्पष्टीकरणंही दिलं...शिवसेनाप्रमुखांनी सामना मुखपत्रातून मराठीचा मुद्दा माझाच असून काहीजण त्याची उचलेगिरी करत असल्याचं म्हटलंय. या टिकेबद्दल बोलतांना राज उवाच... हिंदुत्व हिंदुत्व शिवसेना काय बोलते. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी संघ,भाजपाकडून उचललाय असं बोललं तर चालणार आहे काय असा प्रतिसवाल केला. मराठीचा मुद्दा कुणाचा हे महत्वाचे नसून मराठीची आंदोलन यशस्वी कोणी केली हे पाहणं गरजेचं असल्याचं ते सांगतात.
शिवसेनेकडं आज मुद्देच त्यांमुळं कधी शरद पवारांची लपून भेट,कधी लपून जेवायला जाण्याची वेळ त्यांचेवर आली असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. बाळासाहेब भाषणात भाजप आणि आघाडीचे उमेदवार असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांचा तसाच भाजपाचा उल्लेख करायला विसरले. मात्र मराठीच्या मुद्यांवर का होईंना त्यांनी माझी आठवण ठेवली हे काय कमी असल्याचं ते सांगतात.
सभेत बाळासाहेबांच्या भाषण अगोदर सभेत दाखवलं असत तर कदाचित सभेला उरली सुरली गर्दीही दिसली नसली...अशी कोपरखळी मारायलाही ते विसरले नाही. शिवसेना-राष्ट्रवादीच छुपा समझोता असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. नेहमीच आपल्या स्पष्टीकरण,बोलण्यानं चर्चेत राहिलेले राज यांनी युती सभेच्या निमित्तानं का होईना पुन्हा एकदा आपल मन मोकळ केलं असंच म्हणता येईल

Sunday, April 5, 2009

संजुबाबाची सायकल पंक्चर


मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या संजयदत्त उर्फ संजुबाबाला न्यायालयानं निवडणूक लढवण्यास मनाई केली. त्यामुळं लखनौमधून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या संजुबाबाची हवा गुल झाली आहे.एवढेच नव्हे तर ज्या सपाच्या सायकलवर स्वार होऊन तो लढणार होता. त्या सायकलची हवा निघून गेल्यानं ते पंक्चर झालंय.

सुरवातीच्या काळात संजुबाबच्या उमेदवारीवरून कॉग्रेस आणि सपात चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशात दोन्ही पक्ष परस्परांविरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यामुळं संजूबाबा कुठल्या पक्षाला स्थान देतात आणि आपलं बाशिंग बांधून घेतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. वडील आणि बहिण कॉग्रेसनिष्ठ असल्यानं संजुबाबा कॉग्रेसची निवड करतील. कॉग्रेसकडून लढतील.अशी अपेक्षा होती.मात्र सपाची निवड करत संजुबाबांनी सर्वानांच दे धक्का दिला.

सैफई इथं सपाअध्यक्ष मुलायमसिंह यांच्या सभेत संजुबाबानं हजेरी लावली आणि तिथंच त्यांची पक्षनिवड निश्चित झाली होती. वडील,बहिणीची कॉग्रेसनिष्ठता बाजूला ठेवत संजुबाबानं सपाची निवड करत सपा कसा वेगळा पक्ष आहे याची स्तुतीसुमने उधळण्यास सुरवात केली. याचं मागचे कारण असे आहे की, संजूबाबाला बहिण प्रियादत्तच्या जागेवर निवडणूक लढवायची होती. पण कॉग्रेसश्रेष्ठी प्रियालाच उमेदवारी देण्यात उत्सुक होती. एवढेच नव्हे तर प्रियाच्या उमेदवारी जवळपास निश्चीतही केली होती.

सपात प्रवेश केल्यानंतर अमरसिंहाच्या सांगण्यावरून संजुबाबानं निवडणूक लढवण्याची तयारी केली. तशी न्यायालयाकडं परवानगी मागितली. अशाच एका गुन्ह्यात दोषी असलेल्या क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दूसह इतर संदर्भ गोळा करून ते न्यायालयात सादर करण्यात आले आणि त्याप्रमाणे आपल्याला निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली. पण न्यायालयानं संजूबाबाला साफ नकार देत चांगलीच चपराक दिली.अर्थात याकामी सीबीआयनं महत्वपुर्ण भूमिका बजावली हे लक्षात घेता येईल.

..कारण काहीही असो पण शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या मुन्नाभाईचं खासदारपदाचे स्वप्न हे भंगलय हे नक्की!

स्वरांचे दादा

गजानन वाटवे...उर्फ बापू...मराठी भावगीत गायनातलं ऋषीतुल्य,आगळंवेगळं व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यपूर्व काळापासून साठच्या दशकापर्यत गजानन अर्थात सर्वांच्या या बापूंनी भावगीत गायिकीवर आपलं अधिराज्य गाजवलं. एकापेक्षा एक सरस आणि तितक्याच श्रवणीय भावगीत त्यांनी गायलं. भावगीत ऐकावं ते बापूंच्याच तोंडून. त्यांचं गीत ऐकण्याची एक वेगळीच गोडी होती. त्यामुळंच न कंटाळता तासनतास त्यांच्या कार्यक्रमात रममाण होणारं अनेक रसिक आपल्याला पहायला मिळतात.
बापूचं स्वातंत्र्यपुर्व काळातलं योगदान कुणी विसरूच शकत नाही. त्यांच्या भावगीतांच्या प्रत्येक स्वरातलं भावदर्शन ही त्या काळाची खरी गरज होती. नेमके हेच हेरून बापूंनी सर्वांसाठी गायले. केवळ पैशासाठीच काम करणारे अनेक कलावंत आपल्याला पहायला मिळतात. बापूंनी पैशापेक्षा कष्टाला अधिक महत्व दिलं. कष्ट केले कि श्रम,पैसा,प्रतिष्ठा आपोआपच मिळते असं त्याचं प्रामाणिक मत होतं. त्यामुळं शेवटपर्यत ते कष्ट करत राहिले.
पुर्वीच्या काळातल्या गायकांमध्ये बापू तसं टॉपलाच होते. मराठी समाजात अस्स्ल मराठमोळ्या भावगीतांना बापूंनी खऱ्याअर्थानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. भावगीत आणि तेही बापूंच्या आवाजात ऐकण्याची एक पर्वणीच असते.तरूण पिढीला खिळवून ठेवणं सोपं काम नाही.पण बापूंनी ते समर्थपणे पार पाडलं. त्यामुळेच त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचा आपण आढावा घेतला तर आलेल्या श्रोतृवर्गात तरूणांची संख्या दखल घेण्यासारखीच होती. तरूणांना खिळवून ठेवणं ही बापूंची वेगळी खासियत.
कवी मनमोहन यांच्या राधे तुझा सैल अंबाडा आणि राजा बडे लिखित नका मारू खडा शिरी भरला घडा...या गीतांनी पुणे- मुंबईसारख्या शहरात खळबळ उडवून दिली. ही दोन्ही गीतं अश्लील असल्याची बोंब संस्कृतीरक्षकांनी उठवून दिली.,रेडीओनेही ही दोन्ही गाणी बॅन केली पण बापूंनी संयम राखला. पुढे पुढे कार्यक्रमात याच दोन गाण्यांना वन्समोअर,टाळ्या मिळू लागल्या आणि बापू लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. चित्रपटातील गाण्याच्या ध्वनिफितीपेक्षाही या दोन गाण्याच्या ध्वनिफितीची सर्वांधिक विक्री झाली. ही बाब निश्चीत लक्षात घेण्यासारखीच आहे.
संगीत क्षेत्रात काळानुरूप अनेक बदल झाले.चित्रपट,दुरदर्शनसारखी माध्यमे आली त्यामुळं भावगीत कार्यक्रमांची मागणी कमी झाली. हेच चाणाक्ष बापूंनी ओळखलं आणि कार्यक्रमांतून दुर झाले....अर्थात बापूंचं वयही झालं होतं...एक काळ गाजवणारे बापू... संगीत क्षेत्रातल्या उदयोन्मुख पिढीसमोर ते आदर्शवतच राहणार हे नक्की!

Saturday, April 4, 2009

जुन्या जाहीरनाम्यांना सोन्याचा नवा मुलामा


निवडणूक मग ती ग्रामपंचायत,बॅंका,पतसंस्था कि विधानसभा,लोकसभा अशी कुठलीही असो,उभा राहणारा प्रत्येक पक्षच नव्हे तर अपक्ष उमेदवार आपण काय सभासद,लोकांसाठी काय करणार हे मांडण्याचा प्रयत्न करतो..त्यासाठी अर्थातच आधार घेतला जातो तो पत्रक,जाहीरनाम्याचा...अपक्ष उमेदवारांच्या जाहीरनाम्यात डोकावलं तर त्यांच्या वैयक्तीक विचारांचा प्रभाव दिसतो. पक्षाच्या जाहीरनाम्यासाठी बुध्दीजीवीची कमिटी नेमली जाते.त्यातूनच अनेक मुद्यांचे एकत्रिकरण त्यात दिसून येते.

वीस पंचवीस वर्षापुर्वीचे काही जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात जुन्या मुद्यांएवढ्याच ताज्या घडामोडींची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच समग्र मुद्यांचा समावेश असलेले असं जाहीरनामे हे वेगळे ठरत होते. निवडणूकीच्यानिमित्तानं काढण्यात येणाऱ्या या जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात वैविध्यपुर्ण असे काहीच आढळून येत नाही. त्या-त्या काळात गाजत असलेल्या चार पाच मुद्यांचा अपवाद वगळला तर सर्रासपणे जुन्यांचा मुद्यांना जाहीरनाम्यात स्थान दिले जाते.

आताच्या लोकसभा निवडणूकीचं निमित्त साधून कॉग्रेस,भाजप,राष्ट्रवादी आणि तिसऱ्या आघाडीनं आपले जाहीरनामे प्रकाशित केले आहे. या सर्वांच्या जाहीरनाम्यावर नजर टाकली तर त्यात वस्तू स्वस्त दरात देणे,शेतीसाठी सवलत देणे,घरे देणे,प्राप्तीकरात सूट,आर्थिक दुर्बलांना आरक्षण,महिला,विद्यार्थ्यांसाठी योजना....इत्यादी इत्यादी त्याच-त्याच मुद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सत्तेवर आल्यानंतर हे करू,ते मिळवून देऊ, त्यासाठी मदत करू,जुन्या योजनांचा पाठपुरावा करू,बंद पडलेल्या योजना सुरु करू...तेच तेच मुद्दे आणि मतदारांसाठी फक्त अश्वासन आणि अश्वासनच दिलेले आहे. त्यापलिकडं काहीच नाही. मतदारांसाठी जाहीरनाम्यातून नवीन ठोस पहायला मिळालेले नाही.....

काही पक्ष,उमेदवांराचा अपवाद वगळता जाहीरनाम्याकडे किती पक्ष गांभीर्यानं पहातात. किती मुद्दे,विषयांची पुर्तता करतात.हे सर्वश्रृत आहे. त्यामुळं जुन्या जाहीरनाम्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्याचा राजकीय पक्षाचा हा प्रकार हास्यास्पद,फसवाच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीची साठी आपण ओलांडली आहे. असं असतांनाही पक्ष,उमेदवारांकडून होणारी फसवणूक थांबलेली नाही. पक्ष मग तो कुठलाही असो. अशा पक्षांच्या या भूलथापांना आपण बळी पडायचे का? त्यांनी नागरीकांना वेड्यात काढायचे आपण ते निमूटपणे सहन करायचे,हे आणखी किती दिवस चालणार.... याचा विचार प्रत्येक नागरीकांन करण्याची गरज वाटते....त्यासाठी हा पंक्तीप्रपंच जाहीरनामा सादर केला.

Wednesday, March 4, 2009

हल्ला श्रीलंकेवर नव्हे क्रिकेटजगतावर


लाहोरमधील गदाफी स्टेडियमनजीक दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला केला. खेळाडूंच्या बसला बारा दहशतवाद्यांनी चारही बाजूंनी घेरले आणि बेछूट गोळीबार केला... रॉकेट डागले...हातबॉम्बही फेकला...क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे....दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे एकट्या श्रीलंका संघावर नव्हे तर संपुर्ण क्रिकेटविश्वावर झाल्याचं बोललं जात आहे...

मुंबईवर झालेल्या २३ नोव्हेंबरच्या हल्ल्यांशी साधर्म्य सांगणारी ही घटना विविधांगांनी उलगडून पाहता येईल. खरं तर भारतीय संघच पाकिस्तान दौ-यावर जाणार होता...पण मुंबईवरील हल्ल्यांची घटना ताजी असतांना किंबहुना या हल्ल्याचा पाकिस्तानात कट शिजला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसं अनेक पुरावेही केंद्र सरकारनं पाकिस्तानला दिलेले आहे. पाकिस्तानंनही हे अतिरेकी आपल्याच देशातून भारतात आल्याचं कबुल केलंय. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सूचलेले आहे.

या दौ-यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं नकार दिल्यानं हा दौरा वाया जाऊ नये म्हणून पाकिस्ताननं श्रीलंका संघास प्राचारण केलं. खरं तर या दौ-यावर जाण्यास अनेक श्रीलंकनं खेळाडूंची इच्छा नव्हती पण तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अर्जुन रणतुंगा यांच्या आग्रहावरून श्रीलंकेका संघाला पाकिस्तान दौ-यावर जाणं भाग पाडलं. एकतर्फी निर्णयामुळं त्यांची नंतर हकालपट्टी झाली हा भाग वेगळा. पण पाकिस्तानातील असुरक्षित वातावरण तेथील अस्थिरता ही सर्वांना माहीती आहे. किंबहुना त्या देशात दिवसागणिक दहशतवाद्यांकडून हल्ल्या करण्याच्या,लोकांना ठार मारण्याच्या घटना घडत आहे. असं असुरक्षेचे वातावरण असतांनाही श्रीलंका संघ या दौ-यावर का आला हे न सुटणारेच कोडे आहे.

या खेळाडूंची निवासव्यवस्था आणि परिसरातल्या सुरक्षेबाबत नेहमीप्रमामे पाकिस्तान क्रिकेट मंडळ,संयोजक गाफील राहीले.....आणि शेवटी टार्गेट असलेल्या श्रीलंका संघावर हल्ला झाला. हल्ल्यात खेळाडूंचा जीव वाचला हे जरी खरे असलेतरी त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झालेला आहे. त्यांच्या जखमा भरून येऊ शकतात पण मनावर झालेला आघात कसा भरून निघणार हा खरा प्रश्न आहे...अडचणीत असलेल्यांना मदत करायला जावे आणि मदतीचे हे फळ मिळावे...अशीच काहीशी अवस्था श्रीलंका संघाची झाली होती.

पुढील काळात श्रीलंका संघ कुठल्याही दौ-यात आत्मविश्वासानं खेळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पाकिस्तान दौ-यावर जाण्यास आता कुठला संघ सहजपणे तयार होणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक दौ-याबाबत नेहमी प्रश्नचिन्हच राहील हे नक्की. या घटनेमुळं आगामी आयपीएल तसंच २०११ मद्ये उपसंखडात होणा-या विश्वकरंडक स्पर्धेसमोरही सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुरक्षेचे नियोजन असेल तरच मानांकित खेळाडू यात सहभागी होऊ शकतात.

या घटनेमुळे अगोदरच अंतर्गत वाद आणि अस्वस्थेनं पोखरलेल्या पाकिस्तान संघाबद्दल चिड,घ्रृणा सर्वांच्याच मनात निर्माण होणं स्वभाविकच आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेट नकाशातून पाकला गायब करण्याचं नियोजनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीवर सुरु असल्याचं बोललं जात आहे.

पुढील काळात श्रीलंका संघ कुठल्याही दौ-यात आत्मविश्वासानं खेळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पाकिस्तान दौ-यावर जाण्यास आता कुठला संघ सहजपणे तयार होणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक दौ-याबाबत नेहमी प्रश्नचिन्हच राहील हे नक्की. या घटनेमुळं आगामी आयपीएल तसंच २०११ मद्ये उपसंखडात होणा-या विश्वकरंडक स्पर्धेसमोरही सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुरक्षेचे नियोजन असेल तरच मानांकित खेळाडू यात सहभागी होऊ शकतात. या घटनेमुळे अगोदरच अंतर्गत वाद आणि अस्वस्थेनं पोखरलेल्या पाकिस्तान संघाबद्दल चिड,घ्रृणा सर्वांच्याच मनात निर्माण होणं स्वभाविकच आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेट नकाशातून पाकला गायब करण्याचं नियोजनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीवर सुरु असल्याचं बोललं जात आहे.

Monday, March 2, 2009

सलाम निसर्गकवीला


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे....अशी भव्य कल्पना घेऊन मानवी कल्याणासाठी प्रार्थना करणारे,निसर्गाबरोबरच माणसाशी तादात्म्य पावलेले निसर्गकवी नामदेव धोंडो तथा ना.धो.महानोर.यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं मानाचा जनस्थान पुरस्कार देऊन नुकतच सन्मानित केलं. त्याबद्दल प्रथम निसर्गकवीला सलाम

नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे एक सांस्कृतिक अधिष्ठानचं. या प्रतिष्ठानची धुरा याच क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींच्या हातात असल्यानं तात्यानंतरही खरोखरच यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. आतापर्यत नारायण सुर्वे,मंगेश पाडगांवकर,विं.दा सारख्या अनेक नावाजलेल्या महनीय व्यक्तींची दखल प्रतिष्ठाननं घेत त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. या मांदीयाळीत यंदा पळखेडच्या एका शेतक-याला अर्थात महानोरांना स्थान मिळालं आणि जनस्थान पुरस्काराच्यारूपानं त्यांच्या कवितेच्या वहीत आणखी एका मोरपिसाला स्थान मिळालं. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

महानोरांनी आपल्या ओबडधोबड जीवनाला आकार देणा-यांत तात्याचं स्थान मोठे होते असं प्रामाणिकपणे नमूद करण्याबरोबरच रसिकांनी मला लिहीण्याचं भक्कम बळ दिलं असंही कबूल करून टाकलं. कवितेसारखीच बरड माळरानावर नवी सृष्टी नवी निर्मिती करण्यातला माझा आनंद सांगता येणार नाही असंही ते सांगतात. महानोराकडे मोठेपणा फार आहे. मराठी भाषा,आपली माती आणि मायबाप रसिकांच्याप्रती त्यांचे ओतप्रेत भरलेलं प्रेमही सर्वांनाच भावते. निसर्ग आणि शेतीच्या सहवासात एकदा की महानोर गेले की मग झालचं त्यांच्या एकाग्र चिंतनातून जन्माला येतो कवितेचा नवा विषय,आशय. या स्फुरण्यातूनच त्याची सहजपणे कविता होते. पुढे कधीतरी या कवितेला चाल लावली जाते आणि ते थेट गाण्याच्या माध्यमातून चित्रपटात झळकते. महानोरांच्या ओठावर रूळलेल्या अनेक कवीता,रचनांनी नाटक,चित्रपटांत स्थान मिळवले आहे...या निसर्गकविची महती वर्णावी तेवढी कमीच ....व्वा,अप्रतिम,लाजवाब,त्यांच्या कवितांना मिळणारी दाद म्हणजे वन्समोअर...यासारके शब्दही त्यांच्यासाठी अपुरे पडतात...रसिकांचे प्रेम आणि भावाचा भूकेला असलेल्या आणि नेहमी नवनर्मितीचा ध्यास घेतलेल्या या निसर्गकवीला आपण फक्त मानाचा मुजला, सलाम एवढेच करू शकतो.....

Friday, February 27, 2009

व-हाडकार रिअली ग्रेट


मला आठवत साधारणतः ते १९९४-९५ साल होतं. ७४ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन नाशिक इथं भरलं. मराठी,हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळी नव्यानेच फॉर्मात असलेले अभिनेते नाना पाटेकर संमेलनाध्यक्ष होते...याच तीन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी व-हाडकर देशपांडेंना आपलं व-हाड निघालंय लंडनलाचा प्रयोग ठेवण्यात आला होता...

व-हाड निघालंयचा प्रयोग.. नाशिककरांसाठी एक मेजवानीच..म्हणूनच कडाक्यांच्या थंडीतही भालेकर हायस्कूलचं मैदान खच्चून भरलेलं....बबन्या,जानराव,बाप्पा यासारखे एक दोन नव्हे तर बावन्न पात्र त्यांनी सादर केलं. एकापेक्षा एक विनोदी पात्र त्यातील प्रसंगांना टाळ्या..शिट्यांची दाद तर मिळालीच पण व-हाडकरांनी संमेलनातच घडलेल्या ताज्या किस्सांचा आधार घेत आपल्याच नाट्य,चित्रपटसृष्टीतल्या नामवंतावर कोपरखळी केली, त्यांचेसारखेच हुबेहुब आवाज काढत हास्यांची कारंजे फुलवण्याबरोबरच सर्वांनाच अक्षरशः गडबडा लोळायला भाग पाडले...

या रात्रीच्या प्रयोगांचं वार्तांकन करण्यासाठी सकाळ पेपरचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. सिंगल कॉलम बातमी साडेअकरालाच देऊन टाकल्यानं बातमी देण्याचं तसं टेन्शन नव्हतं. हा प्रयोग रात्री दिड दोनपर्यत चालला....उशिर झाल्याचं आहे तर मग व-हाडकरांना भेटून जाऊ असं मनाशी ठरवत मी सर्व निघून गेल्यानंतर त्यांच्या मेकअप रूममध्ये गेलो. तिथंही त्यांच्या चाहत्यांची गर्दी खच्चून भरलेली...कुणी त्यांचेबरोबर वैयक्तीक,फॅमिलीसह छायाचित्र काढण्यास,कुणी स्वाक्षरी घेण्यास,कुणी त्यांना आपल्या भेटीचा प्रसंग सांगण्यात व्यस्त होते...यापैकी लगेचच मला काहीही शक्य नसल्यानं मी एका कोप-यात बाजूला उभा होतो...

ब-याच वेळानं माझा नंबर लागला. बाळ बोल तुझं काय काम आहे...असं म्हणतं देशपांडेनी संवाद साधायला सुरवात केली...पत्रकारीतेत नवीनच एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर काय बोलावं, कसं बोलावं आणि काय विचारावं हेच सूचत नव्हतं...क्षणभर स्वतःला सावरलं आणि माझी ओळख करून देत काही नाही गप्पा मारायच्या एवढंच सांगितलं...एखादी व्यक्ती असती तर एवढ्या रात्री आणि गप्पा कशाला उद्या भेटू...बहुधा असंच उत्तर दिलं असतं...पण रात्री तीन-सव्वातीनलाही देशपांडेनी माझ्यासोबत गप्पा मारल्या, होय हे खरं आहे, अगदी खरं आहे. त्यांनी गप्पा मारल्या त्या तेवढ्याच फ्रेश मुडमध्ये, मेकअप,ड्रेस काढत देशपांडे...

माझ्या प्रत्येक प्रश्न काळजीपुर्वक ऐकत उत्तर देत होते....आईचे संस्कार,घडवण्यात असलेला कुटुंबाचा हातभार,शिक्षण,प्राध्यापक असल्यानं आलेले अनुभव...यासारख्या गप्पा झाल्या.नाट्याक्षेत्रातील त्यांचे अनुभव, प्रसंग निवडून तो सादर करण्याची हातोटी खरोखरच ग्रेट. एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडं असलेला कॉन्फीडेन्स दखल घेण्यासारखाच...साडेतीनपर्यत गप्पाची ही मैफल रंगली...देशपांडे माझ्या एक-एक प्रश्नांना न थकता उत्तर देत होते...अखेर माझे प्रश्न संपले, मला मुलाखत आटोपती घ्यावी लागली.. पण देशपांडे थकले नाही....अजून काही विचारायचे राहून गेले आहे का...असल्यास जरूर विचारा...मी प्रश्नांच उत्तर जरूर देईल..असं म्हणणा-या व-हाडकार खरोखरच ग्रेट आहे....मला त्यांची प्रत्येक गोष्ट भावली...असा हा नाट्यवेडा कलावंत आपल्यातून सोडून गेल्याची हुरहूर सर्वांनाच लागली आहे...त्याच्या जाण्यानं जानराव,बबन्या,बाप्पा यासारखी गाजलेली पात्र मात्र पोरकी झाली हे नक्की...

मंत्र्याचा घरचा आहेर...पण आताच?

अदिवासी समाजाचे नेतृत्व करणा-या मंत्र्यांची संख्या मंत्रीमंडळात मोठी आहे. पण खरोखरच या समाजाचे प्रश्न शासनस्तरावर मांडण्यात हे मंत्रीमहोदय यशस्वी झाले आहे काय...याचं उत्तर इतर जातींपेक्षा याच समाजातील जनता व्यवस्थित देऊ शकतील. अदिवासी समाजाचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांनी राजीनामा देत आपणच या समाजाचे खरे कैवारी आहोत हे दाखवून दिले आहे. त्याचबरोबर इतरही मंत्री,आमदार राजीनामे देतील असं म्हटलं. खर पण पिचडांचा अपवाद वगळता इतर कुणीही राजीनामा दिलेला नाही. एवढेच नाही तर पिचड यांनी नाव उच्चारलेले माजी शिक्षण मंत्री आहे. वसंत पुरके यांनी पळकुटे धोरण स्विकारत. आपण राजीनामा दिलेला नाही. पिचडांना आपल्या राजीनाम्याचं जाहीर वक्तव्य करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न उपस्थित केला आहे....एक मात्र नक्की की,अदिवासी समाजाचे मंत्री, आमदार आगामी काळातील लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच राजीनाम्याचे हे नाटक करत आहे.
सर्व जणांनी सरकारला दिलेली ही राजीनाम्याची धमकी म्हणजे घरचा आहेरच आहे असं बोललं जातं...पण त्यांना आताच का ही बुध्दी सुचली...स्वतःला अदिवासी समाजाचे कैवारी म्हणून घेणा-या या मंत्रीमहोदय,आमदारांना आताच का राजीनाम्याची बुध्दी सूचली याचा विचार जनतेनं करणं गरजेचे आहे.अदिवासी मंत्री असतांना पिचड यांनी अनेक महत्वपुर्ण योजना या समाजासाठी राबवल्या आहेत. त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले असलेतरी अदिवासी बांधवासाठी हे निर्णय योग्यच होते. शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा कार्यकाळ सुध्दा विविध निर्णयांनी गाजला.
मंत्री विजयकुमार गावीत सध्या मंत्रीपद भूषवत चांगली कामगिरी बजावत आहे. त्यांच्याही काळात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहे. अदिवासी बांधवाच्या प्रश्नांसाठी आमदारांनी विविध प्रश्न उपस्थित करून विधानसभेत आवाजही यापुर्वी उठवला आहे.हे सर्व जरी खरं असलं तरी या मंत्री महोदय, आमदारांना अदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या जागांवर इतरांची बेकायदेशीर नेमणूक झाल्याचा मुद्दा आताच का सूचला आहे.
दोन आठवड्यापुर्वी नाशिकमध्ये अदिवासी संमेलन झालं. या संमेलनात अदिवासी बांधवाच्या सर्वकष बाबींचा विचार करण्यात आला. या संमेलनास बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे लक्षात घेऊन मंत्रीमहोदय,आमदारांनी आपण समाजाच्या प्रश्नांसाठी प्रसंगी राजीनामे देऊ. असं सांगत गर्दीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला...हे सगळ खरं असलंतरी या मंत्री,आमदारांचे राजीनाम्याचे नाटक हे आगामी लोकसभा निवडणूकींत समाजबांधवांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे...पिचड यांनी राजीनामा देऊन याकामी पुढाकार घेतला आहे पण इतरांनी अजून राजीनामे दिलेले नाही. या सर्वाना समाजाची खरी कदर असेल तर त्यांनी एकाचवेळी राजीनामे सादर करणे आवश्यक होते...पण त्यांच्यातरी आपआपसात मतभेद आहे. कुठल्याही मुद्यांवर एकमत नसल्याचं यानिमित्तानं उघड झाले आहे....

Thursday, February 19, 2009

किस्सा प्रेस कॉन्फरन्सचा....


बांद्रा इथलं हॉटेल ताज लँन्ड....निमित्त बीसीसीआय गुणगौरव सोहळा आणि न्युझीलंड दौ-यापुर्वीच्या पत्रकारपरिषदचं....समोर साक्षात कर्णधार माही अर्थात महेंद्रसिंह धोनी,प्रशिक्षक गॅरी कर्स्टन,एक दिवसीय सामन्याचे व्यवस्थापक निरंजन शहा आणि बीसीसीआयचे सचिव श्रीनिवासन.....सुरु होतो एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार आणि स्वभाविकच पत्रकारांच्या उत्तरांना तोंड देतात ते फक्त माही आणि गॅरी...

न्युझीलंडमध्ये दाखल होण्यापुर्वीच न्युझीलंड संघावर भारत वर्चस्व राखेल का...श्रीलंका,इंग्लंडविरूध्दची विजयी परंपरा कायम राहील का...हवामानाशी जुळवुन घ्याल का...अठरा महिन्याचं कर्णधारपद कसे वाटले...हरभजनसिंगच्या संघातील समावेशानं संघास कितपत फायदा होईल.... यासारखे हलकेफुलके प्रश्न आणि तितकीच हास्यांची कारंजे फुलवणारी उत्तरे

दोन्ही बाजूंनी असा हा हसत खेळत प्रश्नोत्तराचा संवाद सुरु आणि मध्येच माही गॅरी आणि आपल्यातील संवाद बिघडलेय.दुरावा निर्माण झालाय...त्यांचा संघातील कामगिरीवर परिणाम होतोय...क्षणभर विचार करा असा प्रश्न अपेक्षित नसतांना एकदम विचारला गेला तर गॅरी,माहीची मनस्थिती काय झाली असेल....होय हे खरंय हा प्रश्न अनअपेक्षितपणे पत्रकार परिषदेत विचारला गेला....आणि इतके वेळ व्यवस्थित सुरु असलेल्या परिषदेत सर्वच गोंधळले...माहीबरोबरच शहा श्रीनिवासनही चक्रावून गेले...पण हजरजबाबी माहीनं स्वतःला सावरत उत्तर दिले गॅरीचे संघास उत्तम मार्गदर्शन लाभते, वेळोवेळी तो सर्वांशी चर्चा करतो,संघानं सध्या मिळवलेल्या यशात गॅरीचा मोठा वाटा आहे...यासारखे खरे माहीनं सांगत गॅरी आणि भारतीय संघात सलोख्याचे संबंध आहे हेच दाखवून दिले या प्रश्नांतून सावरतोय नाही तोच

यंदा जर्सी बदलण्याचं कारण काय,जर्सी बदल्यानं आतापर्यतच्या कर्णधाराला दौ-यात अपयशच आलेले आहे...आपलं...आपल्या दौ-याचं होणार काय...हा प्रश्न येऊन धडकला....आता जर्सी बदलली आहेच मग बघू दौराच काय होते ते...हे उत्तर देत धोनीनं वेळ मारून नेली. या दोन्ही हजरजबाबी उत्तरानं माहीचं कौतुक करावं तेवढ थोडच आहे

Tuesday, February 17, 2009

राष्ट्रकुलसाठी भरीव तरतूद

स्पर्धपैकी एक असलेली मानाची स्पर्धा म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ओळखली जाते. ही स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीत होत आहे. या स्पर्धेसाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात किती आर्थीक तरतूद करते. याबद्दल क्रीडाक्षेत्रात उत्सुकता होती. काल सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारनं ९६४.४२ कोटींची तरतूद केली आहे. या तरतूदीत स्टेडियम्सचे नूतनीकरण,खेळाडूंचे प्रशिक्षण, क्रीडांगणांची डागडुजी अशा काही कामांचा समावेश आहे. एक मात्र नक्की की या तरतूदीमुळं दिल्लीत क्रीडाक्षेत्र वाढीसाठी पुरक ठरतील अशा कायमस्वरूपाच्या सुविधा उभ्या राहण्यास मदत होणार आहे.
विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचं काम जवळपास एक वर्षापासून विविध पातळीवर सुरु झाले आहे.संयोजक दिल्लीकर सध्या याच कामात जास्त व्यस्त असल्याचं दिसून येते. दिल्लीवर जबाबदारी असल्यानं खेळापासून तर आदरातिथ्यापर्यत सर्वच पातळीवर आपण कमी पडणार नाही. याची काळजी ते घेतांना दिसत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकजूट दाखवलेली दिसते.
आपली स्पर्धा असल्यांन त्यात कुठलीच कसर राहता कामा नये हाच प्रत्येकाचा हेतू आहे. त्यामुळंच स्पर्धानिधीला तरतूदीला कुणाचाही विरोध दिसला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या९६४.४२ कोंटीच्या भरीव तरतूदीशिवाय क्रीडा व युवक कल्याणसाठीचा निधीही वाढवण्यात आला आहे. हा निधी गेल्या वर्षी१५९३ कोटी रूपये होता. ती रक्कम आता १७६४ रूपयांच्या घरात गेली आहे. ही देखील चांगली बाब आहे. राष्ट्रकुलच्या रक्कमेतील६०० कोटी रूपये भारतीय क्रीडा प्राधिकरणाला स्टेडियमच्या नुतनीकरणासाठी तर शंभर कोटी रूपये संघाच्या तयारीसाठी देण्यात आले आहे. यात स्टेडियमचे अत्याधुनिकरण करण्याबरोबरच संघास प्रोत्साहन दिले आहे असं म्हणता येईल.
स्टेडियम तर अत्याधुनिक होईल पण आतील क्रीडांगणही मैदानही तितकेच सुसज्ज असायला हवे यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे सर्व राजकीय सपोर्ट मिळाल्याशिवाय करणं शक्य नाही. अर्थात दिल्लीकरांचा त्यासाठी खरोखरच खूप सपोर्ट मिळत आहे. दिल्लीकर आता आठ ते नऊ महिन्याचा कालावधी राहिला आहे... कीप इट अप...

Friday, February 13, 2009

सरांचा दे धक्का....


शिवसेना कार्यकर्ता,नगरसेवक...आमदार...खासदार आणि देशातील मानाचे लोकसभेचे सभापतीपद भूषवण्याची संधी मिळालेले शिवसेना जेष्ठ नेते मनोहर जोशी. शिवसेनेंतच नव्हे तर सर्वांनाच सर म्हणून परिचित असलेल्या सरांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचं जाहीर करत सर्वांनाच दे धक्का दिला आहे.
वक्तृत्वशैली, संघटनकौशल्य, नियोजनबध्द काम आणि शिस्त,संयम आणि शांततेला प्राधान्य देणारे नेते म्हणून ते परिचित आहे. त्यामुळंच बाळासाहेबांच्या निवडक जवळच्या सहका-यांमध्ये जोशीसरांचा नंबर तसा वरचाच. शिवसेनेत बाळासाहेबाचा शब्द हा अंतिम असतो. जोशी सर देखील या अंतिम शब्दाचे प्रामाणिकपणे पालन करतांना नेहमीच दिसतात. अंतर्गत राजकारण,डावपेच तर त्यांना मूळीच पसंत नाही.
कार्यकर्ता हा तळागाळात काम करणारा आणि दिलेल्या कामाशी प्रामाणिकच हवा असं त्यांना मनोमन वाटते. पक्षात त्याचदृष्टीनं तसाच कार्यकर्ता घडवण्यावर त्यांचा भर दिसतो. असे हे सर सध्या त्यांच्या निवडणूकीच्या मुद्यांन चांगलेच चर्चेत आले आहे. सरांना तिकीट मिळणार यात शंकाच नाही. त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांपासून तर अगदी नातलगापर्यत सर्वांनीच तयारी सुरु केलेली होती.
जोशी सर कुठून निवडणूक लढवता हा प्रश्न किरकोळ होता. पण दोन दिवसांपुर्वी सरांनी अचानक आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. आणि सर्वानांच आश्चर्यांचा धक्का दिला. सर निवडणूक लढवणार आणि आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड मोडून प्रचंड मतांनी विजयी होणार यात शंका नाही. त्यादृष्टीनंच सर्व नियोजन झालेलं होते. मात्र सरांच्या या निर्णयानं मिडीयावले अचंबित झाले. सर असा निर्णय घेतील अस कुणालाही वाटलं नव्हते
.....युतीतील त्यातही दिल्लीतील राजकारणाची योग्य माहीती असणारे ते एक जबाबदार नेते म्हणून परिचित आहे. त्यामुळं सरांवर सभांतील प्रमुख वक्ते आणि सभा नियोजनांची जबाबदारी त्यांचेवर टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय विशेषतः मुंबईच्या सभांचा प्रमुख भार त्यांचेवर असेल...आघाडी सरकारच्या अपयशाचा पाढा जनतेसमोर मांडणं. तसंच केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याचं ध्येय असेल. याशिवाय राज्यात युतीचा भगवा फडकावण्याचं आवाहनंही त्यांचेसमोर असेल. त्यादृष्टीनं त्यांना सुत्रबध्द नियोजन करावं लागेल.

दलबदलूंची चलती...

लोकसभा निवडणूकीची तारीख अद्याप निश्चित नाही. पण एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यादृष्टीनं कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपा,शिवसेना,बसपा जनता दल अशा सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. पक्षाशी एकनिष्ठ असणा-या जेष्टांबरोबरच तरूणही पक्षाच्याच तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, नातेवाईकांच्या माध्यमातून तिकीट मिळवण्यासाठी संपर्क साधला जातोय. वशिला लावला जात आहे. काहींनी निवडणूकींचा चंग इतका बांधला आहे कि पक्षानं तिकीट न दिल्यास प्रसंगी इतर पक्षात जायचे, दुस-या पक्षानंही तिकीट नाकारलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचीच असा निश्चय मनाशी केला आहे. अशा दलबदलू कार्यकर्ते,इच्छुकांप्रमाणेच त्यांच्या पाठीराख्यांची तिच अवस्था झाली आहे.
पक्षाशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहणा-या कार्यकर्ते, नेत्यांची संख्या कमी नाहीत. प्रत्येक पक्षात असे डझनभर नेते,कार्यकर्ते आपल्याला पहायलाही मिळतील. पण पक्षातील एकनिष्ठता,प्रामाणिकपणाचं हे सुत्र गेल्या काही वर्षापासून बदलत चालले आहे. पक्षांपेक्षा स्वतःची पद,प्रतिष्ठा जपणा-या पुढा-यांची संख्याच वाढू लागली ही स्थिती थोड्याफार प्रमाणात सर्वच पक्षात आहे. पक्षांनी भरमसाठ पद निर्माण केल्यानं गल्लोगल्ली नेते,संघटक,पुढारी झालेले आपल्याला दिसतात. वरची पदे मिळायला लागल्यानंतर निवडणूक लढवण्याविषयीच्या त्यांच्या अपेक्षांही वाढणं स्वभाविकच आहे. हे जरी खरं असलं तरी पक्षातील या युवा अथवा बरेचवर्ष काम करणा-यांचा त्रास जेष्ठांना होऊ लागला आहे.
आगामी निवडणूकीतसर्वच पक्षांनी यंगजनरेशनचा अर्थांत तरूणांना संधी देण्याचा राग आळवला आहे. पण त्यांमुळं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील जेष्ठ नेत्यांची मोठी गोची झाली आहे. तरूणांना संधी दिल्यास आपले काय होणार याबद्दल चिंता आहे. दुसरीकडं सर्वच पक्षात तिकीट वाटपावरून गोंधळ होणार हे नक्की आहे. त्यामुळे युवकांचीच नव्हे तर पक्षातील जेष्ठांची नाराजी पत्कारावी लागेल. त्यातून स्वभाविकच पुढे बंडखोरी होणेही शक्य आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून इच्छुक असलेले उघडपणे बंडखोरीची भाषा करू लागले आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीनं ग्रासणार हे आता नक्की आहे. या अशा स्थितीमुळं सर्वाच मोठी अडचण ही संबंधीत नेत्यांला, पदाधिका-याला पाठींबा देणा-या पाठीराख्यांची होणार आहे. साहेब बाहेर पडतील आणि आपल्या बरोबर हजारो कार्यकर्ते आहे असं सांगत डांगोरा पिटतील. आणि मग त्यांचे पाठीराखेही स्वभाविकपणे म्हणतील.
केवळ साहेबांना(पदाधिकारी,नेत्याला) पक्षानं तिकीट नाकारलं म्हणून ते बाहेर पडले आणि त्यामुळं आम्हाला पक्षातून बाहेर पडणं गरजेचं होतं, अशा पाठीराख्यांची संबंधीत पक्षात काम करण्याची इच्छा असूनही केवळ साहेबांमुळं त्यांना बाहेर पडाव लागणार आहे....हे कार्यकर्ते,स्वयंसेवक स्वतः कधीच काही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच उठण्या-बसण्यापासून सर्व काही साहेबांवरच अवलंबून असते. सारखे एका पक्षातून दुस-या तिस-या पक्षात जाणा-यां, स्वयंघोषित दलबदलू पुढा-यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणं पक्षाला शक्य नाही.
पण लोकांनी अशा दलबदलू नेत्यांला त्यांच्या कार्यकर्त्यांना किती जवळ करायचे, त्याला किती साथ द्यायची हे लोकसभेपुर्वीच निश्चीत करायला हवे. आपल्या भागासाठी अशा व्यक्ती, कार्यकर्त्यांचा काही उपयोग नसेल तर त्यांना निवडून देण्यापेक्षा दूर ठेवणेच योग्य वाटते...अखेर हा ज्यांचा-त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे हे नक्की...

Friday, February 6, 2009

देव तारी त्याला....


ठिकाण चर्चगेट रेल्वेस्टेशन....वेळ सकाळी साडेनऊ-दहाची...जिवाची मुंबई अर्थांत मुंबई फिरण्यासाठी औरंगाबादकडील एक जोडपं आपल्या दोन जुळया मुलींसह स्थानकावर उभे होते...कधीही लोकलचा प्रवास न केलेल्या या सुशिक्षित जोडप्यास आपल्या बोरीवली इथल्या नातेवाईकांकडं जायचे असल्यानं ते लोकलची वाट पहात होते... सकाळची वेळ असल्यानं रोजचीच तोबा गर्दी. गर्दी कशाला म्हणता याचा आणि गर्दीतील प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर वेस्टर्न साईटला जरूर जावे असे म्हणतात. अगदी तशीच परिस्थिती येते. हे जोडपं नवीन असल्यानं या भागाची फारशी काहीच माहीती नाही. त्यामुळं इकडं तिकडं चौकशी करून त्यांनी कसातरी प्लँटफॉर्म गाठला खरा पण तोही चूकीचा...त्यांना प्लँप्टफॉर्म संदर्भात चूकीची माहीती देण्यात आली होती. बोरीवलीकडं जाणारी नऊ अडोतीसची लोकल येण्याची उदघोषणा झाली...आपण चूकीच्या प्लॅटफार्मवर उभे आहोत. हे लक्षात आल्यानंतर जोडप्यांची एकच धांदल उडाली. तोबा गर्दीतून वाट काढत जुळ्या मुलींसह ते उभी असलेली गाडी पकडण्यासा जोडपे धावले. प्लॅटफाँर्मवर पोहचले जरूर...लोकलची सवयच नसलेल्या त्या महिलेनं एवढ्या गर्दीतून गाडीही पकडली...एक मुलगी तिच्याबरोबच चढली पण दुसरी मात्र खालीच राहिली....फास्ट लोकल असल्यानं लोकल वेग घेऊ लागली...तोबा गर्दीमुळं पतीला चढण्याची संधीच मिळाली नाही. ती महिला डब्यात चढलेली असल्यांन तिची मोठी पंचाईत झाली....एका मुलींला लोकलमध्ये आत सोडून दुस-या मुलींला घेण्यासाठी खाली उतरणं तिला शक्य नव्हतं...आई गाडीत बसल्यानं प्लॅटफार्मवर उभी असलेली ती मुलगी रडत रडत धावतच सुटली...गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या महिलेनं बाहेर उडी घेण्याचा प्रयत्न केला....गर्दीतून बाहेर अंग झोकून देण्याचा प्रयत्न केला.....तिचं शरीर आत आणि पाय प्लॅप्टफॉर्मवर अशी परिस्थिती होतीर...एवढ्या गर्दीतून मुलींबरोबर धावणा-या तिच्या पतीनं हे दृश्य पाहिलं...त्यांन तिचं बाहेर असलेले हात पाय दोन्हीही आत जोरात ढकलून दिले आणि प्लॅटफॉर्म संपण्याच्या आत स्वतःलाही सावरलं..... चर्चगेट स्टेशनवरही पती आणि त्या दुस-या मुलींची गोंधळलेली स्थिती झाली होती. तिकीट,पर्स आणि मोबाईल, पैसे सर्वजण त्या माणसाकडंच असल्यानं त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. काहीच माहीती नसल्यानं चूकून पुरुषांच्या डब्यात शिरलेली ती महिला आणि तिची मुलगी दोघेही रडायला लागल्या..लोक त्या दोघींची समजूत काढत होते...कुठे जायचे...कुठून आल्यात यासारखी चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते....एकापाठोपाठ एक स्टेशन जात होते पण त्या मायलेकीचं रडण काहीच थांबत नव्हते...बोरीवलीला जायचंय एवढेच सांगत त्या दोघीही रडतच होत्या...अखेर त्या गर्दीतील एका माणसानं पतीकडं मोबाईल आहे का..असल्यास नंबर सांगा असं म्हणत त्या महिलेची समजूत काढली...गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या त्या महिलेनं स्वतःला सावरत पतीचा मोबाईल नंबर त्याला व्यक्तीला सांगितला...त्या व्यक्तीनं तातडीनं तो मोबाईल लावत त्या महिलेचं आणि तिच्या पतीचं संभाषण करून दिलं...एकमेकांत बोलण झाल्यानं त्या दोघांनाही आधार वाटला...बोरिवली स्टेशनवर उतरून पोलिसांजवळ थांबण्याच ठरलं...पती आणि तिची दुसरी मुलगी हे दुस-या लोकलनं बोरीवलीला उतरले...तो माणूनस आपल्या पती आणि मुलींचा शोध घेऊ लागला...त्याला दोघीही एका पोलिसांजवळ उभ्या असलेल्या दिसल्या....त्या महिलेनं तातडीनं पतीला मिठी मारली...दुस-या मुलींला जवळ घेत कुरवाळले...आणि आपल्या बोरीवलीच्या नातेवाईकांना फोन करून त्यांनी बोलावून घेत मग त्यानंतर त्याच्याबरोबर घरी गेले.. मोबाईलद्वारे संपर्क करून देणारी ती व्यक्ती देवाच्याच रूपात आली असावी शिवाय देवामुळंच आपण वाचलो असं महिलेला वाटू लागलं. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी...याची अनुभूती या जोडप्याला रेल्वे प्रवासात आली. असे प्रसंग नेहमीच घडतात पण त्यावेळी संबंधीत व्यक्ती परिस्थितीनुसार किती दक्ष आणि आणि सामजस्य भूमिका घेते यावर बरेच काही अवलंबून असते....

रॉय निमित्तानं पुन्हा चर्चा शासन निर्णयाची


राज्यात सत्ता कुणाचीही असो, संबंधीत सत्ताधा-यांच्या कालावधीत घेतलेले निर्णय नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत राहतात. राज्यातील एखादा प्रश्न अथवा क्षुल्लक कारण देखील चर्चेसाठी पुरेसे ठरू शकते. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि मुंबई बॉम्बस्फोटांच्या सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळं पोलिस महासंचालक विरोधकांनी अनामी रॉय यांना जबाबदार धरत टिकेची झोड उठवली. एवढेच नव्हे तर नागपूर अधिवेशनातही रॉय यांचाच मुद्दा सर्वीधिक चर्चीला गेला. पुर्ण अधिवेशन संपले पण विरोधकांनी रॉय यांचेवर केलेल्या आरोपासंदर्भात कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळं विरोधक आणखीनच संतप्त झालेले होते.
पोलिस महासंचालकपदी अनामी रॉय यांची गेल्या वर्षी केलेल्या नियुक्तीवरून राज्य शासन पुन्हा अडचणीत आले आहे. किंबहुना त्यांना आता एक वर्षांनी का होईना आपला निर्णय बदलावा लागणार आहे. मुख्य न्यायमुर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. शरद बोबडे यांनी राज्यशासनानं विशेषतः गृहमंत्री आर.आर.पाटील यांचेवरही कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. न्यायालयानं आपल्या निर्णयाला दोन आठवड्याची स्थिगिती दिली आहे. या कालावधीत सरकार आणि रॉय काय भूमिका घेतात. याकडं सर्वांच लक्ष लागलंय.
या दोघांनी सर्वीच्च न्यायालयात जाऊन स्थिगिती न मिळवल्यास रॉय यांना कदाचित पदावरून दूरही व्हावे लागेल. अधिका-यांची नियुक्ती गेल्या काही वर्षापासून चर्चेचा विषय बनली आहेत. आपल्या मर्जीप्रमाणं कृती करतील. किंबहुना आपल्याच तालावर नाचतील, आपली पाठराखण करतील अशाच अधिका-यांना मोठ्या पदावर संधी दिली जात असल्याचं सर्वश्रृत आहे. कारण महत्वाच्या पदावरील हे अधिकारी अडचणींच्या वेळेस आपल्या पाठीशी भक्कम उभे राहतील, आपल्याला सोडवू शकतात अशी मंत्र्यांची भावना असते. पण कधी कधी हेच अधिकारी सरकार,मंत्र्यांसाठी अडचणीचे ठरू शकतातहे देखील टाळता येत नाही.
पोलिस महासंचालकांच्या रेसमध्ये रॉय यांच्यासह एस.एस.विर्क, एस.चक्रवर्ती आणि जीवन वीरकर हे चार वरिष्ठ अधिकारी होते. या तिघांना डावलून रॉय यांची नियुक्ती केली. या नियुक्तीलाच चक्रवर्ती कॅटकडं आव्हानं दिलं होते. न्यायालयानं रॉय यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतल्यानं पुढील कारवाई काय होते याकडं सर्वांच लक्ष लागलय. दुसरीकडं शासनाचा हा निर्णयही वादग्रस्त बनलायं....

Thursday, February 5, 2009

सुरांची अठ्ठाऐंशी



पंडित भिमसेन जोशी...संगीतविश्वातील अनोखं नाव...अशा या स्वरभास्करानं ८८ व्या वर्षात पदार्पण केलं. आपल्या रागदरीच्या अनोख्या सुरांनी अवघ्या विश्वाला वेड लावणा-या पंडितजीच्या जीवनात दोन आनंददायी घटना घडल्या आहेत. एक दिड महिन्यापुर्वीच त्यांना शासनानं पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर आता त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सारेगामा इं.लिमिटेड कंपनीनं पंडितजीच्या खूप जुन्या दुर्मिळ रेकॉर्ड चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
या गाण्याच्या निमित्तानं पंडितजींचा जुना खजिनाच हा चाहत्यांना मिळणार आहेत. पंडितजीची मैफल म्हणजे चाहत्यांसाठी एक मेजवाणीच असते. सुरु झालेल्या मैफलीचा समारोप होऊच नये. असंच प्रत्येक चाहत्याला वाटते. गाजलेल्या शास्त्रीय संगीतातील प्रत्येक रागदरींचा अविष्कार हा चाहत्यांना नेहमीच हवाहवासा वाटतो. त्यातही एखादे नवीन रेक़ॉ़र्ड असेल तर चाहते त्यांच्या कॅसेट घेण्यावर तुटुन पडतात. पंडितजींच्या कॅसेट हातोहात संपल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
पंडितजींच्या सुरवातीच्या काळातील सर्व शास्त्रय संगीताचे गायन एकत्र झाल्यामुळं रसिकांना हे संगीताचे वैचारिक धन उपलब्ध झाले आहे. प्रत्येक परिवारात या दुर्मिळ ध्यनीफिती हव्याच असं आग्रहानं सांगावास वाटते. पंडितजींनी गायलेली तुम रब साहेब....ही बंदीश सर्वात प्रथम ध्वनिमुद्रीत केली होती. ही बंदिश गाऊन त्यांनी रसिकांना भारावून टाकले होते. त्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून श्रीनिवास जोशी यांनी तुम रब साहेब....आणि भैरवी रागातील फुलवन गेंद से मैला ना मारो मेरे राजा.... या दोन बंदिशी सादर करून आपले गुरु आणि पिता पंडितजींना अनोखा स्वरभेट दिलेली आहे. ही ध्वनिफित अनोख्या स्वरूपात रसिकांनासाठी उपलब्ध झाली आहे.
या सीडीत प्रामुख्याने पंडितजींच्या १९४६सालच्या पहिल्या रेकॉर्डिंगचा समावेश आहे. यात प्रत्येकी तीन मिनिटांच्या सहा बंदीशी आहेत. पंडितजी जेव्हा आपल्या गुरुकडे गाण्याचे शिक्षण घेत होते. त्यांच्या गायनावर गुरुंची छाप दिसते. यानंतरच्या पुढच्या काळात त्यांनी गायनात काय बदल केले. याचा अंदाज रसिकांना या सीडीमधून येऊ शकतो. पंडितजींच्या गायनाचे हे अनोखे दालन रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सारेगामा इ.लिमिटेडच्या सर्व कंपनीचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते...

Tuesday, February 3, 2009

कॉग्रेसनं आळवला यंग जनरेशनचा राग


कॉग्रेसनं आळवला यंग जनरेशनचा राग
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच काँग्रेसनं राष्ट्रीय स्तरावर एकला चलो.....चं धोरण जाहीर केलंय. असं करून समाजवादी पक्षाला धक्का देतांनाच, पक्षानं तरूणाईचा रागही आळवलायं. कॉग्रेसनं युवा नेते राहुल गांधींना तरूणांचे आयकॉन म्हणून पुढे करायला पक्षानं सुरूवात केलीय.
आगामी निवडणूकीमध्ये पस्तीशीच्या आत असलेले सुमारे आठ टक्यांवरचे तरूण मतदार पुढचं सरकार निवडणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसला तरूणांना आकर्षीत करत तीस टक्के जागा देण्याचं अश्वासन देणं भाग पडलयं. एकीकडं कॉग्रेस तरूणांना साद घालत आहे. तर दुसरीकडं अर्जुनसिंगासारखे ऐंशीतले जेष्ठ नेते खुर्ची अडवून आहे. त्यामुळं कॉग्रेसचीच नाही तर तरूणाईची गोची झाली आहे.
अर्जुनसिंगासह निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या जेष्ठांना समजवायचे कसे. त्यांची मनधरणी करायची कशी हाच कॉग्रेससमोरील मुख्य प्रश्न आहे. जेष्ठांना पक्षातील सन्मानाची पदे देण्याचं नियोजन कॉग्रेसनं केव्हाच सुरु केलंय. त्याप्रमाणं जेष्ठांवर जबाबदारीही सोपवली जात आहे. या विसंगत पार्श्वभूमीवर कॉग्रेसनं यंग जनरेशनचा राग आळवलाय. एकीकडे तरूण तुर्कांना साद घालतांना कॉग्रेसनं कोणत्याही घटकपक्षाबरोबर राष्ट्रीय पातळीवर समझोता न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय युपीएतल्या घटकपक्षांना दे धक्काच म्हणता येईल. समाजवादी पक्ष जागा वाटपाबाबत दबाव आणत आहे.
त्यापार्श्वभूमीवर कॉग्रेसनं एकला चलो...चं पाऊल उचलत घटक पक्षांसाठी सूचक इशारा दिला असल्याच मानलं जातंय. कॉग्रेस कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. हे कॉग्रेस दाखवू इच्छित असलीतरी, ज्या राज्यात कॉग्रेसची शक्ती क्षीण आहे. तिथं स्वबळावर लढण म्हणजे आत्मघात ठरेल. असा कयास राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय.

साहेबांचा इलेक्शन मूड

साहेबांचा इलेक्शन मूड
एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूका होणार हे आता स्पष्ट झालयं. त्यादृष्टीनंच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यानियोजनाला सरकारी कार्यालय तरी कसं अपवाद असू शकत. या कार्यालयाच्या स्तरावरही नियोजनाची धामधुम सुरु झाली आहे. आपल्या कार्यालयातून नेहमीच घरी लवकर जाणारे साहेब(कधी अर्धेसुट्टी घेऊन), सध्या एका फार मोठ्या कामात व्यस्त आहेतअर्थांतच त्यांचेवर ही जबाबदारी वरिष्ठांनी टाकलीआहे. साहेब(कुठल्याही व्यक्तीगत कामापासून ते आर्थिक देवाणघेवाणपर्यत सर्वच कामांचे उत्तम नियोजन करण्यात माहिर आहे.
आपल्यावर टाकलेली टाकलेली जबाबदारीही ते यशस्वीपणे पार पाडतात. साहेबाचं मार्गदर्शन आणि नियोजनांखाली झालेले अनेक कार्यक्रम उल्लेखनीय झाले आहे. याची दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीही नोंद घेत त्यांचं कौतुक केलय. साहेब सरकारी अधिका-यांच्या श्रेणीतही वरचे समजले जातात. आपण साहेब असल्यानं जिल्ह्याची जबाबदारी स्वभाविकपणे आपल्यावरच येणार आहे. हे त्यांना माहीत आहे. त्यामुळंच त्यांनी इलेक्शनची सर्वप्रकारची तयारी सुरु केली आहे.
दररोज अकरा बाराला कार्यालयात हजर होणारे साहेब आता नऊ-साडेनऊलाच कामावर हजर होतात, घरी जाण्याची पुर्वीची चार-साडेचारची वेळ आता त्यांनी बदलू टाकलीय. गेल्या आठ दहा दिवसांपासून ते रात्री साडेआठनंतरच घरी परतात. साहेबांचा मूड सध्या इलेक्शनचा असल्यानं त्यांच प्रतिबिंब त्यांच्या कामांत उमटतय हे खरं असलं तरी त्यांचा त्रास कर्मचा-यांना होऊ लागलाय. साहेब आता दररोजच लवकर कार्यालयात येतात आणि उशिरानं घरी जातात त्यामुळें साहेबांप्रमाणं नेहमीच कार्यालयात उशिरानं येणारे तसंच लवकर घरी जाणा-या कर्मचा-यांची चांगलीच गोची झाली आहे.
दैनंदिन कामाचा ताण तर वाढला आहेच पण त्याही कर्मचा-याचं अधिक शोषण होऊ लागलंय.शिस्तप्रिय असणा-या साहेबांनी केलेल इलेक्शनचं नियोजन फत्ते करण्याची जबाबदारी कर्मचा-यांची आहे. चांगल्या कामांनंतर खात्याचा पर्यायानं साहेबांचा गौरव होईल, पण कर्मचा-यांना काय, असा प्रश्न कार्यालयाच्या स्तरावर उपस्थित होऊ लागलाय, इलेक्शनपुर्वीच सरकारी कार्यालयातील या अतिरिक्त कामानं कर्मचारी हैराण झालेय....सरकारी नोकरी आणि साहेबांचा इलेक्शन मूड असल्यानं कामाची जबाबदारी कर्मचा-यांना टाळता येणार नाही हे मात्र नक्की...

फेल्प्स चर्चेत पण वेगळ्या....


फेल्प्स चर्चेत पण वेगळ्या....
बिजींग आँलिम्पिक स्पर्धेत सर्वीधिक आठ सुवर्ण पदकांची कमाई करणारा आणि जलतरणातील विक्रम आपल्याच नावे नोंदवणारा जलतरणपटू ओळखा कोण असेल तो...अर्थातच अमेरिकेचा मायकेल फेल्प्सस्....बिजींगमध्ये तेवीस वर्षीय फेल्पसनं कधी नव्हे एवढे जादुई चमत्कार घडवले. आपल्या कामगिरीद्वारे त्यानं जलतरणात एकाग्रता आणि संयम किती महत्वाचा आहे हेच जणू दाखवून दिले आहे. बिजींगस्पर्धेमुळं मायकेल फेल्प्स सर्वाधिक प्रकाशझोतात आला...एका सर्व्हेक्षणानुसार बिजींग स्पर्धेनंतर त्यांच्या केवळ अमेरिकनच नव्हे तर इतरही देशाच्या चाहत्यांच्या संख्येत कितीतरी पटीनं वाढ झाली आहे. दिवसागणिक चाहत्यांची ही संख्या वाढतच आहे. हाच अमेरिकेचा विश्वविक्रमी जलतरणपटू सध्या वादाच्या भोव-यात सापडलाय. न्युज आँफ द वल्र्ड या ब्रिटिश दैनिकात फेल्प्सन गांजासेवनाची नळी तोंडाला लावण्याचा छायाचित्र प्रसिध्द झालंय. त्यामुळं नामांकित खेळाडूंच्या मादकद्रव्य सेवनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आपला परफाँरमन्स चांगला व्हावा यासाठी स्पर्धेपुर्वी, स्पर्धेदरम्यान मादक द्रव्य सेवन करणा-यां खेळाडूंची संख्या कमी नाही. अँथलेटिक्स,शरीरसौष्ठव या क्रीडाप्रकारांनी तर कमालच केली आहे. फेल्प्सला मैत्रीण नाही तसेच त्यानं कठोर मेहनत केली. त्यामुळं त्याला बिजींग आँलिम्पिकमध्ये घवघवीत यश संपादन करता आलंय. फेल्प्सच्या गांजा सेवनाच्या वृत्तानं पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात खळबळ उडाली आहे. आपण गांजा सेवन केल्याची कबूली फेल्प्सनं दिलीय. माझे वर्तन खेदजनक होते आणि मी चूकीचे कृत्य केले. मी जलतरणात यश मिळविले असले, तरी माझे वर्तन वाईट झाले. लोकांना माझेकडून अशी अपेक्षा नाही...अशी प्रांजळ कबूली देत यापुढील काळात असं घडणार नाही असे वचनही त्यांन चाहते आणि लोकांना दिलेय...हे खरं असलं तरी गांजा सेवनामुळं फेल्प्सवर झालेली टिका भरून येणार आहे का असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. याशिवाय केवळ वचन दिलं आणि पुढील काळात काही न सेवन करण्याची ग्वाही दिलं म्हणजे सर्व संपत का...असंही बोललं जात आहे. म्हणतात ना यशाचं शिखर गाठण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागतात मात्र अपयश अथवा निंदा नालस्ती होण्यासाठी एखादी कारणही पुरेस ठरतं...अवघ्या तेवीस वर्षी जागतिकस्तरावर जलतरणात चमत्कार घडवणा-या फेल्प्सच्या बाबतीत वरील विधान तंतोतंत खरे ठरले असं म्हटल तर वावग ठरणार नाही....

गो हेड इंडिया....


दिल्ली टेनिसपटू युकी भांब्री यानं ज्युनिअर आँस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारतीय टेनिसमध्ये नवा ठसा उमटवला आहे. या कामगिरीची ऐतिहासिक कामगिरी म्हणूनही भारतीयांना नोंद घेता येईल. याच स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा- महेश भूपतीनं यश नोंदवत भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. हा एक नवा इतिहासच रचला आहे असंही म्हणता येईल. भूपतीचे दुहेरी, मिश्रदुहेरीतील हे अकरावे ग्रँन्डस्लम आहे. या अकरापैकी सात विजेतेपद हे मिश्र दुहेरीतले आहे. त्यामुळं त्यांच्या कामगिरीचा आलेख निश्चीतच उंचावत आहे. दुसरीकडं दुखापत आणि इतर कारणांमुळं सानिया गेल्या काहि दिवसांपासून फार्मात नाही. तिला प्रत्येक सामन्यात अपयश येऊ लागले आहे.

वर्षाच्या सुरवातीलाच थेट ग्रँन्डस्लँम टेनिस स्पर्धेत महेशच्या साथीनं तीनं नोंदवलेले हे यश तिला पुढील कामगिरीसाठी निश्चीतच उभारी,प्रोत्साहन देणारं ठरेल असं वाटत. ग्रँन्ड स्लँमवर नाव कोरणारी ती पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. पण भूपतीनं भारतीय टेनिसपटूच्या अर्थात सानियाच्या साथीनं नोंदवलेलं हे ग्रँन्ड स्लम प्रथमच होय. यापुर्वी महेश भूपतीला मार्क नोल्सच्या साथीनं खेळतांना पुरुष दुहेरीच्या अजिंक्यपदाने हुलकावणी दिली होती. पण मिश्र दुहेरीत त्यानं सानियाबरोबर जेतेपदाची ही संधी अचूक हेरली आणि तमाम टेनिसचाहत्यांना खुश केल.सानिया सुखावली आहे.

विशेषतः या तिघांच्या यशामुळं भारतीय टेनिसपटूच्या वाटचालींला नवी दिशा मिळण्यास ते पुरेसे ठरणार आहे. या तिघांच्याही खेळाचं वेगळे वैशिष्ठ आहे. त्यामुळं अप्रतिम, अफलातून यासारखे शब्द त्यांच्या खेळाचे वर्णन करतांना तोकडे पडतात. हे जरी खरे असले तरी भूपतीच्या वेगवान सर्व्हीसला सानियाच्या पॉवरफुल फोरहॅन्डच्या फटक्यांची उत्तम साथ लाभली हे लक्षात घेता येईल. सानियाला महेश बरोबरच्या सामन्यातून महत्वाच्या काही टिप्स मिळाल्या असतीलच. त्या तिला पुढील कामगिरीसाठी निश्चीत कामा येतील. एखाद्या टेनिसपटूनं सामना खेळतांना किती संयम राखला पाहिजे, संतुलन ढळू न देता किती आत्मविश्वासानं खेळले पाहिजे हे युंकी भ्रांब्रीच्या खेळानं दाखवून दिलं. संपुर्ण सामन्यात तो आत्मविश्वासानं खेळला. सेटमध्ये चूका झाल्या म्हणून आपले संतुलन ढळू न देता पुढील सेटमध्ये त्यावर मात करत त्यानं आपला खेळ सुधारण्यावर भर दिला. चांगला खेळ दाखवत संपुर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. ज्या नवोदित टेंनिसपटूंनी या तिघांचा सामना पाहण्याचा आनंद घेतला. त्याचेसाठी या सामन्यातून नक्कीच काही महत्वाच्या टिप्स मिळाल्या असतील असं म्हणता येईल....टेनिस हंगामाला सुरवात झाली आणि त्याबरोबरच युंकी,महेश आणि सानियानं भारतीयांना ग्रँन्डस्लँमच्या रूपानं अजिंक्यपद मिळवून दिलय.....

या यशाचं एकाच वाक्यात वर्णन करता येईल गो हेड इंडिया...गो हेड इंडिया....